ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पडाळी वस्तीत आग, दोन सिलिंडर फुटल्याने मोठा भडका

खडकी, दि. १९ - खडकीच्या औंध रस्त्यावरील आंबेडकर चौकाजवळ असलेल्या पडाळी वस्तीमध्ये आज (शुक्रवारी) रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. प्राथमिक माहितीनुसार दोन सिलिंडर फुटल्याने आगीचा मोठा भडका उडाला असून घटनास्थळी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या आठ फायरगाड्या रवाना झाल्या.

प्राथमिक माहितीनुसार, खडकीमधील पडाळी वस्तीमध्ये आज (शुक्रवारी) रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास येथील नागरिकांनी स्फोटाचा मोठा आवाज ऐकला. स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर नागरिक सैरावैरा पळून गेले. या स्फोटानंतर या वस्तीमध्ये आग भडकली. आग लागलेली पाहताच काही नागरिकांनी त्वरित घरातील सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.

मात्र या वस्तीमध्ये मांडवाचे साहित्य ठेवण्यात आल्यामुळे आग आणखी भडकली. या वस्तीमध्ये बहुतांश झोपड्या या पत्र्याच्या असून या आगीत १५ ते २० झोपड्या जळून पूर्णपणे खाक झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोचण्यास अडचण येत असल्याने या वस्तीलगत असणाऱ्या रॉयल कॅसल या मोठ्या गृहप्रकल्पाच्या अग्निशमन यंत्रणेतून पाण्याची फवारणी करण्यात आल्याने आग लवकर आटोक्यात आणण्यास मोठी मदत झाली. स्थानिक रहिवासी कार्यकर्ते यांनी प्रसंगावधान दाखवून आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने आग लवकर आटोक्यात आली.

या आगीत झोपडी भस्मसात झाल्याचा धक्का सहन झाल्याने एक महिला चक्कर येऊन पडली होती. तिला तातडीने रुग्णवाहिकेत उपचार करण्यात आले. या वस्तीत सुमारे ५० घरे असून त्यापैकी सुमारे २०-२५ घरांना आगीची झळ पोहचली.