ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी-चिंचवड शहरातील बेघर नागरिकांना रात्रीसह दिवसाचाही निवारा

पिंपरी, दि. २२ – पिंपरी-चिंचवड शहरात पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण १०५ बेघर आढळून आलेले आहेत. त्यांची पिंपरी भाजी मंडई येथील रात्रनिवारा केंद्रात राहण्याची सोय केली जाणार आहे. त्यांना दिवसाचाही निवारा दिला जाणार आहे. शहरात बेघरांना येण्यापासून रोखता येत नसल्याचा दावा महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महासभेत केला.

राज्य सरकारच्या २८ ऑगस्ट २०१४ च्या आदेशानुसार राज्यातील पिंपरी-चिंचवडसह ५३ शहरामध्ये राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत शहरी बेघरांना निवार्याची सोय करण्याची तरतूद आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या १४ जुलै २०११ च्या निर्णयानुसार रात्रनिवारा कार्यान्वित करून त्यांचे संचलन आणि देखभाल करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिने शहरात १० मार्च २०१७ ला प्रभागनिहाय शहरी बेघरांचे सर्वेक्षण केले. त्यात केवळ १०५ बेघर आढळून आलेले आहेत. त्यासाठी पिंपरी भाजी मंडई येथील महापालिकेमार्फत चालविण्यात येत असलेला रात्रनिवार्याचे नूतनीकरण केले जाणार आहे. तेथे या १०५ बेघरांना निवार्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रात्रनिवारा केंद्रात नव्याने स्थापत्य विद्युतविषयक कामे केली जाणार आहेत. सुरक्षेसाठी 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या करीता एकूण ५० लाख २७ हजार ९७५ रूपये खर्च अपेक्षित आहे. सदर खर्च केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांना निवारा योजनेतून करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव वरील मुंबई येथील प्रशासन संचालनालयास पाठविला जाणार आहे. या प्रस्तावाला शनिवारी (दि.१९) झालेल्यास सर्वधारण सभेत मान्यता देण्यात आली.

या संदर्भात नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर आयुक्त हर्डीकर यांनी सभागृहात खुलासा केला. ते म्हणाले की, ही योजना केंद्राच्या आदेशानुसार त्यांच्या निधीतून चालविली जाते. मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात १०५ बेघरांचा आकडा निश्चित झाला आहे. त्या दृष्टिने सध्या नियोजन केले जात आहे. शहरात येणार्यांची संख्या निरंतर सुरू राहते. त्याला बंधन घालता