ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मिलिटरी डेअरी फार्मच्या कर्मचा-यांचे पिंपरीत धरणे आंदोलन

पिंपरी, दि. २३ - केंद्रीय संरक्षण विभागाने देशभरातील ३९ मिलिटरी डेअरी फार्म १४ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म देखील बंद होणार आहे. डेअरी फार्म बंद करण्याच्या निषेधार्थ खडकी-पिंपरी सिव्हिलियन एम्प्लॉईज मिलिटरी फार्म ट्रेड युनियनच्या वतीने आज (बुधवारी) पिंपरीत एक दिवसाचे धरणे आंदोलन सुरु केले आहे.

डेअरी फॉर्म येथून कर्मचा-यांनी सकाळी दहा वाजता रॅली काढली. त्यांनतर पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात एकदिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. सायंकाळी पाचवाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मिलिटरी डेअरी फार्मचे अध्यक्ष शिवाजी टाक, हरिशंकर यादव, रमेश यादव, दिलीप यादव, देवेंद्र यादव, संतलाल यादव, दत्तात्रय कांबळे, भारतीय मजदूर संघाचे अर्जुन चव्हाणसुरेश भालेराव, आझाद यादव, सोनू यादव, प्रदीप यादव, कमलेश यादव, राजाराम फाळके, पद्मा तिरखुंडे, स्वाती बांगडे, नंदा थोरवे, उमा भोसले, मीरा तिरखुंडे, नंदा तिरखुंडे, रेखा खापरे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

केंद्रीय संरक्षण विभागाने देशभरातील ३९ मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाची झळ पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्मला देखील बसणार आहे. हजारो गायी देशभरातील डेअरी फार्ममध्ये आहेत, डेअरी फार्म बंद झाल्याने गायीचे भवितव्य धोक्यात आले आहे. या फार्ममध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. फार्म बंद झाल्याने त्यांच्यावर देखील आर्थिक संकट येणार आहे.

मिलिटरी फार्म कोअर ही संस्था ब्रिटिश सरकारने १८८९ मध्ये सुरू केली. भारतात एकूण ३९ मिलिटरी डेअरी फार्म आहेत. त्यामध्ये एकूण २५ हजार पेक्षा अधिक संकरित गायी असून चार हजार पेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक (देवळाली) आणि पिंपरी येथे मिलिटरी डेअरी फार्म आहेत. त्यातील एकट्या पिंपरी डेअरी फार्ममध्ये हजार संकरित गायी असून दररोज सात हजार लिटर दूध संकलन होत आहे.