ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बहिणाबाई चौधरी उद्यानातील दोन अजगर चोरीला

पिंपरी, दि. २४ – बहिणाबाई उद्यान जेवढे पर्यटकांसाठी प्रसिद्ध नाही तेवढे ते चोरी प्राण्यांच्या मृत्यूसाठी प्रसिद्ध होत आहे. गेल्या दहा महिन्यांपासून मगर चोरीला जाणे, सापांचा मृत्यू, मगरीचा मृत्यू त्यानंतर आता २० तारखेला उद्यानातून चक्क दोन मोठे अजगर चोरीला गेले आहेत. मात्र प्रशासानाने हा विकृत मनोवृत्तीच्या लोकांचा उद्यानाला बदनाम करण्याचा षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.

चिंचवड येथील संत बहिणाबाई जौधरी सर्पोद्यानात मगरी चोरीला जाणे, सापांच्या मृत्यू पाठोपाठ आता उद्यानातून चक्क दोन अजगर चोरीला गेले आहेत. ही घटना रविवारी (दि.२०) रात्री बारा ते सोमवारी (दि.२१) पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. यामध्ये तीन कुलुप एक पिंजरा तोडत चोरट्यांनी एक साडे सहा फूट एक साडे सात फुट लाबींचे अजगर चोरले आहे.

याप्रकरणी सर्पोद्यानाचे प्रमुख अधिकारी दीपक सावंत म्हणाले की, रविवारी रात्री पाऊस होता, त्यात लाईट गेली होती आणि पूर्ण साडेसात एकरच्या या उद्यानसाठी रात्रपाळीसाठी केवळ दोन सुरक्षा रक्षक होते. त्यामुळे चोरट्यांनी याचा फायदा घेत हात साफ केला. मात्र ही चोरी उद्यानाला जाणून बुजून बदनाम करण्याठी केली आहे. कारण चोरी करायचीच होती तर खोलीतील इतर वस्तू किंवा इतर साप कसे चोरीला गेले नाहीत. तसेच अजगरांची तस्करीही होत नाही. त्यामुळे केवळ बोभाटा व्हावा बदनामी व्हावी यासाठी अजगर चोरले आहेत. तसेच सोमवारीच महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी उद्यानाला भेट दिली असून त्यांनी उद्यानात सुरक्षा रक्षक वाढवणार असून सीसीटीव्ही बसवणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
मात्र पोलिसांनी गेल्या तीन दिवसात याबाबतीत कोणी तक्रार द्यायलाच आले नाही असे सांगितल्यामुळे प्रशासन हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे म्हणाले, बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातील दोन भारतीय अजगरांची रविवारी रात्री Posted On: 24 August 2017