ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पालिका कल्याणकारी योजनांच्या अनुदानात वाढ, अटी व शर्तीत बदल

पिंपरी, दि. २६ - महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागातील इतर मागासवर्गीय कल्याणकारी योजनेचा सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये योजनांच्या अनुदान रकमेत वाढ करण्यात आली असून योजनांच्या अटी शर्तीत काही बदल केला असून याला महासभेची देखील मंजुरी मिळाली आहे. आयुक्त  श्रावण हर्डीकर यांच्या मान्यतेनंतर त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा लाभ मागासवर्गीय इतर समाजातील घटकांना दिला जात आहे. कल्याणकारी योजनांमधून यापूर्वी दिलेल्या योजनांचे अर्थसहाय्य कमी प्रमाणात होते. आता सुधारीत प्रस्तावात त्यात वाढ केली आहे. यामध्ये पाचवी ते दहावी मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत दुप्पट वाढ केली आहे. पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना हजार ऐवजी हजार आणि आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना हजार ऐवजी हजार शिष्यवृत्ती केली आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी एमबीए यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. यात यापूर्वी १५ हजार रुपयाऐवजी आता २५ हजार रुपये दिले जाणार आहेत. परदेशातील उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात येते. त्यातही वाढ करून एक लाख रुपयांऐवजी एक लाख ५० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करण्यास आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सायकली वाटप केल्या जातात. यापुढे मुला-मुलींना सायकली भेट देता, त्यांना सायकल खरेदी करण्यास चार हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

इतर कल्याणकारी योजनेतून अनाथ, निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांची गुणवत्ता वाढीस लागावी, याकरिता अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेत पहिली ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणा-यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेत पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना चार हजार रुपयाऐवजी १० हजार रुपये, दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयाऐवजी १२ हजार रुपये, Posted On: 26 August 2017