ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्वाईन फ्लूने घेतला महिलेचा बळी, मृतांचा आकडा ३६ वर

पिंपरी, दि. २६ - स्वाईन फ्लूमुळे मोरवाडी पिंपरी येथे राहणा-या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात २८७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २३३ रुग्णांना बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे.  

मोरवाडी पिंपरी येथील ४० वर्षीय रुग्णाला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून १७ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने रुग्णाला २३ ऑगस्ट रोजी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. २४) रोजी तिचा मृत्यू झाला

सौम्य ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे स्वाईन फ्लूच्या प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. आजाराच्या पुढील टप्प्यात ३८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक ताप, तीव्र घसादुखी, घशाला सूज येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिड, झोपाळूपणा अशी लक्षणे दिसून येतात. अजूनही १८ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.