ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एच.ए. मैदानावर पालिका करणार क्रीडांगण, हरकती सूचना मागविल्या

पिंपरी, दि. २८ - हिंदुस्थान अँटिबायोटिक् (एच..) लिमिटेड कंपनीच्या ताब्यातील ५९ एकर जागा विक्रीस सरकारने परवानगी दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ही जागा खरेदी करणार असून त्याठिकाणी क्रीडांगण करणार आहे. यासाठी पालिकेच्या नगररचना विभागाने त्या जमिनीवरील आरक्षण फेरबदलाची कार्यवाही सुरू केली असून, नागरिकांच्या हरकती सूचना आठ सप्टेंबरपर्यंत मागविल्या आहेत.

केंद्र शासनाच्या हिंदुस्थान अँटिबायोटिक् लिमिटेड कंपनीच्या ताब्यातील पिंपरी येथे सर्वे नं. १०३, १०४, १०५, १०६, १६९ पैकी (सि..नं. ६३५४, ५२०० पैकी) मधील कंपनीच्या ताब्यातील अतिरिक् ६६ एकर जमीन खुल्या बाजारात विक्रीस काढली आहे. त्यापैकी अतिरिक् ५९ एकर जमीन कंपनीला विक्री करण्यास राज्य शासनाच्या महसूल वन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, ५९ एकर क्षेत्राची जमीन उक् विकास योजनेत निवासी विभागात समाविष्ट आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एच. . कंपनीची ५९ एकर जागा स्थित असून, वाहतूक रस्त्यांच्या जाळ्याने देखील सोयीस्कर आहे. नागरिकांना सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास ती जमीन उपयुक् आहे. त्यामुळे महापालिकेने सदरील जागा मंजूर विकास योजनेत बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित करण्यात येणार आहे. शहराच्या सुधारित मंजूर विकास योजनेत एचए कंपनीच्या ताब्यातील अतिरिक् ५९ एकर जमीन बहुउद्देशिय सार्वजनिक मैदान या प्रयोजनासाठी आरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करणे फेरबदलाची विहित कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव शासन मंजुरीस्तव सादर करण्यात येणार आहे.

फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक नगररचना, महापालिका कार्यालयात ठेवण्यात आलेला आहे. या फेरबदलाबाबत नागरिकांच्या काही हरकती सूचना असतील, तर सप्टेंबरपर्यंत सादर कराव्यात. त्यानंतर फेरबदलाबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांचा विचार केला जाणार नाही. तसेच, तो फेरबदलांचा प्रस्ताव शासन मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.