ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पावसांच्या सरीत पाच दिवसाच्या गणरायाला भक्तीभावे निरोप

पिंपरी, दि. २९ - गणपतीच्या आगमना नंतर आज (मंगळवारी) ५ दिवसांच्या गणरायाला भावीक भक्ती भावे निरोप देत आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवडच्या २६ घाटांवर चोख प्रशासन व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

गणरायाच्या स्वागताला वरुण राजाने हजेरी लावली होती. आज पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी ही वरुण राजाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जसे बाप्पा छत्रीमध्ये किंवा कारमध्ये आले होते तसेच बाप्पा आजही छत्रीचा आधार घेत नदी घाटावर जात आहेत. पावसामुळे घाटावरती आरती करताना भाविकांची तारांबळ होत आहे मात्र तरीही पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भावीक अगदी विधीवत गणरायाचे विसजर्न करत आहेत.

विसजर्नासाठी पिंपरी, थेरगाव, काळेवाडी, मोशी अशा २६ घाटांवर हे विसर्जन होणार असून नदी पात्रात पाण्याचा प्रवाह पाणी पातळी पाहता सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना खोल पाण्यात उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच गणपती मूर्तीचे विसर्जन हे विसजर्न हौदातच करा सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करा असे आवहनही महापालिका पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.