ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पवना धरणातून ५९७० क्युसेक पाण्याचा विसर्ग; कोथुर्णे पुल पाण्याखाली

पिंपरी, दि. ३० - पवना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कायम असून रात्रीपासून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. पवना धरणातून ५९७०0 क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने शिवली पुल मावळातील कोथुर्णे पुल पाण्याखाली गेले आहेत.

गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पवना सांडव्याचे सहा दरवाजे अर्धा फुटाने उचलून धरणाच्या सांडव्यातुन २२०८ क्युसेकने पाणी सोडण्यात सुरूवात केली होती. त्यानंतरही पावसाचे प्रमाण वाढत गेल्याने पुन्हा पवना नदीतील पॅावर हाऊसने १४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. परंतु दिवसभरामध्ये पावसाचा जोर वाढल्याने काल पवना धरण परिसरामध्ये १४० मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाल्याने काल सांडव्यातून ४५७० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पॉवर हाऊसने १४०० सांडव्यातून ४५७० असे एकूण ५९७० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. 

त्यामुळे शिवली पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावातील नागरिकांचा पवनानगरशी संपर्क तुटला आहे. शिवली पुलावरून पाणी गेल्याने शिवली, भडवली, येलघोल धनगव्हाण, खडकवाडी काटेवाडी या गावांचा पवनानगर येथे येण्याचा संपर्क तुटला आहे. त्यांना शिवली ते ब्राम्हणोली या मोठ्या पुलावरून पवनानगरकडे यावे लागते. या भागातून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय करणारे नागरिक आहेत. त्यांना सकाळी सात वाजता दूध संकलन करण्यासाठी पवनानगर येथे यावे लागते. त्यामुळे त्यांना सकाळी ब्राम्हणोली मार्गे अथवा कडधे मार्गी पवनानगर किंवा कामशेतला जावे लागत आहे. तर सकाळच्या सुमारास मावळ जवळील कोथुर्णे पूल देखील पाण्याखाली गेला आहे.