ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सोशल मिडीयाच्या नावाखाली करदात्यांच्या उधळपट्टी रोखा - मारुती भापकर

पिंपरी, दि. ३१ - शहरातील नागरिकांच्या गरजांचा विचार करुन विविध दर्जेदार विकास प्रकल्प राबवून त्याचा प्रत्यक्ष लाभ अनुभूती ज्यावेळी शहरवासियांना येईल. त्यावेळी जनता सत्ताधा-यांचे कौतुक करेल. त्याला प्रसिद्धीही आपोआप मिळेल. मात्र, भाजप पदाधिका-यांच्या सुपीक डोक्यातून करदात्या नागरिकांच्या पैशातून स्वत:च्या प्रसिद्धी मुलाबाळांच्या पोटापाण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी सोशल मिडीया उभा करण्याबाबत खटाटोप सुरु आहे. त्यामुळे सोशल मिडीयाच्या नावाखाली करदात्या नागरिकांच्या ७५ लाखांची होणारी  उधळपट्टी रोखण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. त्यादृष्टीने मीडिया सेलची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी तीनवर्ष कालावधीसाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. या कामासाठी ७५ लाखांपेक्षा अधिक पैशाचा चुराडा करण्यात येणार आहे. भाजपने स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख कारभाराची हमी जनतेला दिली आहे.

शहरातील नागरिकांच्या गरजांचा विचार करुन विविध दर्जेदार विकास प्रकल्प राबवून त्याचा प्रत्यक्ष लाभ अनुभूती ज्यावेळी शहरवासियांना येईल. त्यावेळी जनता सत्ताधा-यांचे कौतुक करेल. त्याला प्रसिद्धीही आपोआप मिळेल. परंतु, कामापेक्षा चमकोगिरीत माहिर असणा-या भाजप पदाधिका-यांच्या सुपीक डोक्यातून करदात्यांच्या पैशातून स्वत:च्या प्रसिद्धी मुलाबाळांच्या पोटापाण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी नामे, बेनामे सोशल मिडीया कक्षाच्या उभारणीबाबत खटाटोप सुरु असल्याचे दिसत आहे, असे भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

त्यामध्ये आयुक्तही सत्ताधा-यांच्या बाजुने चुकीचे निर्णय घेत आहेत. हा कक्ष सुरु झाला. तर, याचा पालिका स्तरावर झालेल्या चुका दडविण्यासाठी, जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठीच या कक्षाचा गैरवापर होणार आहे. एकीकडे करदात्यांचे पैसे वाचविण्यासाठी रोजनिशी (डायरी) बंद करण्यात आली. तर, दुसरीकडे अशा प्रकारे सोशल मिडीया स्थापून वर्षाला २५ ते ५० लाखांची उधळपट्टी करण्याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. ही करदात्या