ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

माजी महापौर मुंबईतल्या अतिवृष्टीतून बचावले मोठ्या गाडीमुळे

पिंपरी, दि. ३१ - मुंबईत २६ जुलै २००६ च्या महाप्रलयाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या परवाच्या मुसळधार पावसानेही पुन्हा एकदा परवा मुंबापुरीला "ओली' धरले. त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत. पाणी मुरलेल्या जुन्या इमारतींची दरडींची पडझड आता सुरू झाली आहे. त्यात दोन डझन बळी गेले आहेत. या"ओली'मध्ये पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर विद्यमान विरोधी पक्षनेते योगेश बहल सापडले होते

सुदैवाने "लॅंड क्रूझर'सारखी मोठी मोटार असल्याने ते या अतिवृष्टीतून बचावले. ११ तास ते एकाच ठिकाणी अडकून पडले होते. नजरेसमोरून छोट्या मोटारी वाहत जाताना पाहिल्यानंतर भीतीने काही काळ मन धास्तावले होते असे या संकटातून बचावलेल्या बहल यांनी सांगितले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर असलेले बहल हे सध्या विरोधी पक्षनेते आहेत. प्रथितयश बांधकाम व्यावसायिक म्हणून ते ओळखले जातात. २९ ऑगस्टला त्यांची मुंबई विमानतळाजवळील "आयटीसी मराठा'या तारांकित हॉटेलात बिझनेस मीटिंग होती. त्यासाठी ते आपले भागीदार अमित फेफडे संदीप दिघे यांच्यासह गेले होते. मीटिंग अडीच वाजता संपली. ते पुन्हा पुण्याला (पिंपरी) यायला निघाले. दरम्यान, बाहेर पाऊस सुरू होता.नंतर त्याने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण मुंबई जलमय झाली.अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी कार्यालयापाशी ते कसेबसे आले. तेथून मानखुर्द येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर येण्यासही त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र,तेथे ते आले आणि अडकून पडले. ते तब्बल ११ तास गाडीतच त्यांना बसून राहावे लागले

या कालावधीत साचलेल्या पाण्यात छोट्या अनेक मोटारी बुडाल्या. तर, काही वाहून जाताना पाहिल्याने भीतीने क्षणभर गाळणच उडाल्याचे बहल म्हणाले. मात्र, मोठ्या अशा उंच मोटारीत आम्ही चौघे (चालकासह) असल्याने रस्त्यावर कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यापासून सुदैवाने वाचलो, असे ते म्हणाले. रात्री उशिरा पाऊस आणि पाणी काहीसा ओसरल्यानंतर ते कसेबसे नवी मुंबईत वाशी येथे पोचले. गणेशोत्सवामुळे हॉटेल्स उशिरापर्यंत उघडी असल्याने तेथे भुकेने व्याकूळ झालेल्या चौघांनी क्षुधाशांती केली. अखेर पहाटे साडेतीन वाजता ते घरी पोचले. अशारीतीने मुंबई ते पिंपरी या तीन तासांच्या प्रवासाला त्यांना मंगळवारी १३ तास लागले. महापुराच्या विदारक अनुभवाला आयुष्यात पहिल्यांदाच यानिमित्त सामोरे गेलो, अशी प्रतिक्रिया त्यातून पूर्णपणे सावरलेल्या बहल यांनी आज दिली