ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वायसीएमची स्थिती पाहून पालिकेचे सभागृह नेतेही चक्रावले

पिंपरी, दि. १ - डॉक्टर, परिचारकांची कमतरता, औषधांचा तुटवडा, पायाभूत सुविधांची वानवा या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) गंभीर समस्या पुन्हा एखदा उजेड्यात आल्या आहेत. निमित्त होते पिंपरी पालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या पाहणी दौ-याचे. रुग्णांची हेळसांड, रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत त्यांनी प्रशासनाची कानउघडणी केली. तसेच वायसीएममधील त्रुटी दूर करण्यासाठी 'सर्जिकल' स्टाईक करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांसमवेत 'वायसीएम' रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी नगरसेविका सुजाता पालांडे, वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, डॉ. रोहणी नगरकर आदी उपस्थित होते. पवार यांनी तीन तास वायसीएम रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी केली. समस्यांचा आढावा घेतला. रुग्णालयातील स्त्री रोग, अस्थिरोग, बालरुग्ण विभाग, रुग्ण वॉर्ड, सोनोग्राफी, भांडार अशा सर्व विभागांची पाहणी केली. तसेच रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. रुग्णालयात मिळणा-या सुविधांबाबत विचारपूस केली.

एकनाथ पवार म्हणाले की, वायसीएम रुग्णालयाची अवस्था अंत्यत बिकट आहे. या रुग्णालयावर पालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. मात्र, त्या तुलनेत रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. रुग्णांची हेळसांड केली जाते. वायसीएमध्ये नेहमीच औषधांचा तुटवडा असतो. सुविधांची वानवा आहे. वायसीएमध्ये अनेक त्रुटी आहेत. डॉक्टरांचे कामावर लक्ष नाही. त्यांचा केवळ खरेदीत रस आहे.

आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाले आहे. त्यामुळे वायसीएममध्ये सुरू असणारी काही लोकांची मक्तेदारी मोडीत काढणार आहे. आम्हाला खरेदीत रस नाही. शहरातील गोरगरिबांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. रुग्णालयातील ज्या अडचणी असतील त्या सोडविल्या जातील. मुनष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व समस्यांचे निराकण करण्यात येईल. याबाबत दोन दिवसात आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे, पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

नगरसेविका सुजाता पालांडे म्हणाल्या की, वायसीएम रुग्णालयाची सेवा अतिशय चांगली आहे. गोरगरीब लोकांना चांगल्या Posted On: 01 September 2017