ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अतिरिक्त आयुक्तांची पोलिसाला धक्काबुक्की, पोलिसाची आयुक्तांविरोधात तक्रार

पिंपरी, दि. २ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी एका पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ करून त्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार गुरुवारी (दि.३१) सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपळेगुरव येथे घडला. याप्रकरणी पोलीस कर्मचा-याने अतिरिक्त आयुक्तांवर कारवाई करावी, असा सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. दरम्यान, याबाबत अतिरिक्त अच्युत हांगे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संजय बेबले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. गणपती विसर्जना दरम्यान पिंपळेगुरव येथील पवना नदीपात्रात शिवाजी शंकर शिंदे या तरुणाचा गुरुवारी (दि.३१) बुडून मृत्यू झाला. याठिकाणी मोठा जमाव जमला होता. त्याचवेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे याठिकाणी पाहणी करण्यासाठी आले. त्यावेळी नागरिक आक्रमक झाले. पालिकेने घाटावर दक्षता घेणे गरजेचे होते, ती दक्षता घेतली नाही. दोर बांधण्याची गरज होती. गतवर्षीही पालिकेच्या चुकीमुळे एका कर्मचा-याचा मृत्यू झाला होता. पालिकेच्या अक्षम्य चुकीमुळेच तरुण बुडाला आहे, असे म्हणत नागरिक अतिरिक्त आयुक्त हांगे यांच्याशी भांडत होते.

अतिरिक्त आयुक्तांशी नागरिक भांडत असताना त्यांच्या सहका-याने बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस नाईक बेबले यांना ' हे तुम्हाला दिसत नाही का ?' असे म्हणत नागरिकांना रोखण्याचे सांगितले.
त्यानंतर अतिरिक्त आयुक्त हांगे यांनी पोलीस नाईक बेबले यांना लाठीमार करण्याच्या सूचना केल्या होत्या, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. बेबले यांनी लाठीमार करण्यास नकार दिला. वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय आपण कोणतीही कारवाई करणार नसल्याचे बेबले यांनी आयुक्तांना सांगितले. त्यामुळे हांगे साहेबांचा पारा चढला. माझे ऐकत नाहीस का? असे म्हणत त्यांनी पोलीस नाईक बेबले यांना शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केली असे बेबले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी अतिरिक्त अच्युत हांगे यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.