ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिकेतील तपासणी पथकाचे कामकाज प्रशासन विभागाकडे

पिंपरी, दि. ४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तपासणी पथकाचे कामकाज आता प्रशासन विभागाच्या संपूर्ण नियंत्रणाखाली होणार आहे. त्यानुसार, तपासणी पथकावरील अतिरिक्त आयुक्तांचे नियंत्रण आणि प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे सोपविण्यात आलेले तपासणी पथकाचे अतिरिक्त कामकाज काढून घेण्याचे आदेश आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी दिले आहेत.  

महापालिका कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी पालिका हद्दीतील नागरिकांच्या तसेच नगरसेवकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. नागरिकांची सनदमध्ये नमुद केलेली कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावीत. कार्यालयीन कामकाजात असलेल्या त्रुटी, उणीवा दूर करण्याकरिता सर्व विभागांची संपूर्णत: किंवा अंशत: तपासणी करणे आणि प्रभावी नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. या तपासणी पथकाचे कामकाज तपासणी पथकाच्या नियंत्रित अधिका-याकडून प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांमार्फत अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्तांकडे सादर करण्याबाबतचे आदेश २७ जानेवारी २०१७ रोजी अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत

तथापि, प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांना '' क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्तांकडील प्रशासन विभागाचे नियंत्रण वगळण्यात आले आहे. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्तांना कामकाजासंदर्भात विषय वाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे तपासणी पथकासाठी स्वतंत्र पुरेसा वेळ देणारा अधिकारी उपलब्ध नाही. तपासणी पथकाची २७ डिसेंबर २०१६ रोजी निर्मिती केल्यानंतर प्रशासकीय कामकाजात आमुलाग्र बदल झाले. त्यामुळे महापालिकेचे तपासणी पथक हे प्रशासन विभागात पुर्वीप्रमाणेच कार्यरत ठेवून संपूर्ण नियंत्रण प्रशासनामार्फत ठेवणे योग्य होईल

ही बाब विचारात घेऊन महापालिकेचे तपासणी पथकाचे कामकाज हे प्रशासन विभागाच्या संपूर्ण नियंत्रणाखाली ठेवण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. यापुढे तपासणी पथकाचे कामकाज, कागदपत्रे प्रशासन विभागाच्या प्रशासन अधिका-यांच्या नियंत्रणाखाली सादर करण्यात यावे. त्यानंतर सहायक आयुक्तांमार्फत थेट आयुक्तांकडे सादर करावे. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने या पथकातील सर्व कर्मचा-यांनी प्रशासन अधिका-यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करावे. तसेच तपासणी पथकावरील अतिरिक्त आयुक्तांचे नियंत्रण आणि Posted On: 04 September 2017