ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी-चिंचवड शहरातील ९० टक्के नागरिकांकडे आधारकार्ड

पिंपरी, दि. ५ - पिंपरी-चिंचवड शहरातील १५ लाख ५३ हजार ५४५ जणांनी आधार कार्ड काढले आहे. तर, अद्याप एक लाख ७४ हजार १४७ नागरिक बालकांनी आधार कार्ड काढलेले नसल्याचे समोर आले आहे.

केंद्र सरकारच्या २०११ च्या जनगणगणेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. शहरातील नागरिकांसाठी आधार कार्ड नोंदणी मोहिम २०११ ला सुरू करण्यात आली. महापालिकेचे नागरी सुविधा केंद्रासह खासगी केंद्रात आधार कार्ड नोंदणी केली गेली. तसेच, नगरसेवक राजकीय नेतेमंडळींनी आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करून नागरिकांना ही सेवा मोफत देऊ केली.

सप्टेंबर २०१७ पर्यंत शहरात एकूण १५ लाख ५३ हजार ५४५ जणांनी आधार कार्ड काढून घेतले आहे. हे प्रमाण ८९.९२ टक्के आहे. तब्बल एक लाख ७४ हजार १४७ नागरिकांनी अद्याप आधार कार्डच काढले नसल्याचे चित्र आहे.

याबाबत बोलताना सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात केवळ १० टक्के नागरिकांकडे आधार कार्ड नाही. त्यामध्ये बालक आणि लहाम मुलांची संख्या सर्वांधिक आहे. आधार कार्ड नसलेल्या नागरिकांसाठी महापालिका विशेष नोंदणी मोहिम राबवित आहे. नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी कोणतेही शुल्क नसून, दुरुस्तीसाठी २५ रूपये शुल्क आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आधार कार्ड नोंदणी करावी. तसेच, महापालिका खासगी शाळांमध्ये आधार कार्ड नोंदणी मोहीम घेण्यात येणार आहे

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती विशेष अभियान गुरुवारी (दि.) रविवार (दि.१०) असे दोन दिवस शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांत आयोजित केले आहे.  शहरातील नागरिकांसाठी नवीन आधार कार्ड नोंदणी करणे, यापूर्वी काढलेल्या आधार कार्डातील दुरुस्ती या अभियानात करता येणार आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या क्षेत्रीय कार्यालयांत जाऊन अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन, महापालिकेने केले आहे.