ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गणपतींना भावपूर्ण निरोप

पिंपरी, दि. ६ - 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,' अशा गजरात आज (मंगळवार) गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. बारा दिवस घरामध्ये विराजमान झालेल्या गणरायाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले होते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील विसर्जन घाटांवर तसेच हौदावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. बारा दिवस मनोभावे सेवा करून पिंपरी चिंचवडकर बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत.

पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये एकूण २६  विसर्जन स्थळांवर श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. घरगुती गणरायाबरोबरच सार्वजनिक मंडळांतील बाप्पाला यावेळी निरोप देण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येत आहेत. काही जणांनी मूर्तीदान केले.

विसर्जन स्थळांवर सुरक्षा मार्गदर्शक त्याचबरोबर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तर अग्निशमन दलाचे पथक, आरोग्य व्यवस्था, विद्युत विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. विसर्जन स्थळांवर पोलीस तैनात असून भाविकांच्या सुरक्षेकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात येत आहे.