ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रिंगरोडबाबत मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा सर्वपक्षीय समितीचा मुहूर्त कधी

पिंपरी, दि. ७ - वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव या दाट लोकवस्ती  परिसरातून जाणा-या प्रस्तावित रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. रिंगरोडच्या प्रश्नाबाबत ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेत पालिका सभागृहात चर्चा झाली आणि सत्ताधा-यांनी समिती गठनाचा निर्णय घेतला. त्यानंतर १८ दिवसांचा कालावधी उलटला तरीही समितीने अद्यापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नाही. त्यामुळे रिंगरोडबाबत मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा सर्वपक्षीय समितीचा मुहुर्त कधी आहे, असा सवाल संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५ टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत.

सभा, मोर्चा, चिंतन पदयात्रा, लाक्षणिक उपोषण, पोस्टकार्ड पाठवा, स्मरण पदयात्रा, प्रबोधन अशा विविध मार्गाने नागरिक  आंदोलन करत आहेत. प्रस्तावित रिंगरोड दाट वस्तीतून देता पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची देखील भेट घेतली.

जुलै महिन्याच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या विरोधी पक्षांनी रिंगरोडवर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. महापौर नितीन काळजे यांनी सभा संपल्यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सभेदरम्यान उपसूचना घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळातच महापौरांनी सभा संपल्याचे Posted On: 07 September 2017