ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रस्त्यावरील टपरी, हातगाड्यांवर महापालिकेने कारवाई करावी - राजेंद्र भामरे

पिंपरी, दि. ३ - पिंपरी-चिंचवड शहरातील  चौका-चौकात असलेल्या टपरी, हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेने  अतिक्रमण हटविण्याची मागणी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सिग्नलच्या कामातील अडी-अडचणींबाबत महापालिकेचे बीआरटीएस अभियंते आणि वाहतूक पोलिसांची सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याकरिता सुधारणेसाठी ट्राफिक सिग्नल या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, यांच्यासह वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक, क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे, चंद्रकांत खोसे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता डी.आर.जुंधारे उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध चौकांतील असलेल्या टपरी, हातगाड्या यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास अडथळा निर्माण होत असून त्यावर महापालिकेने कारवाई करावी. 
महापालिकेच्या अधिका-यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमणाबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. तसेच वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा केलेल्या व करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला वाहतूक विषयक सभा घेण्यात यावी, असे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी सांगितले.