ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ऑन ड्युटी झोपा काढणारे पिंपरी डेपोतील १० कर्मचारी निलंबित

पिंपरी, दि. ५ - अॉन ड्युटी झोपा काढणा-या पिंपरी, भोसरी आणि निगडी डेपोतील पीएमपीएमलच्या १० कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात ऑन ड्युटी झोपा काढणा-या ९ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले होते. 
पदभार स्वीकारल्यानंतर पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कामगिरी सुरु केली आहे. कर्मचा-यांच्या कामाची सात तासाची आठ तास वेळ केली. त्यानंतर लेटलतीफ कामगारांचा एकदिवसाचा पगार कापला. पुण्यातील ऑन ड्युटी झोपा काढणा-या ९ कर्मचा-यांना निलंबित केले गेले. 
पीएमपीएमलच्या सर्व डेपोची रात्री तपासणी करण्यासाठी चार जणांच्या 'फ्लाईंग' पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने सोमवारी रात्री पिंपरी, भोसरी आणि निगडी डेपोमध्ये अचानक भेट दिली. त्यावेळी वर्कशॉपमध्ये काम करणारे १० कर्मचारी झोपलेले सापडले.  त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 
पीएमपीएलच्या गाड्यांची देखभाल दुरुस्तीची कामे करणे कर्मचा-यांनी अपेक्षित होते. मात्र, ऑन ड्युटी ते झोपा काढत होते, असे पीएमपीएलच्या अधिका-यांनी सांगितले.