ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हॅरिस पुलावर स्कूल बस जळून खाक

पिंपरी, दि. १० - पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील हॅरीस पुलावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मिनीबसने आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांना योग्यवेळी बसमधून बाहेर काढल्याने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र ती स्कूल बस पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे दापोडी-बोपोडी परिसरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. 

दापोडीकडून खडकीच्या दिशेने जात असलेल्या एका स्कूलबसमधून अचानक धूर येऊ लागला आग भडकली. बसचालकाने जवळील पाण्याच्या बाटलीतील पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग चांगलीच भडकल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बसचालकाने बसमधील पाच-सहा विद्यार्थ्यांना बाहेर काढले त्यांना बरोबर घेऊन तो निघून गेला, अशी माहिती या घटनेचे प्रत्यक्षदर्शी बाबा भिका माळी यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिली. 

पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. बसचालक बस सोडून निघून गेल्यामुळे ती कोणत्या शाळेची स्कूल बस होती, याबाबत पोलिसांना अजून माहिती मिळू शकली नाही. 

दापोडीकडून खडकीच्या दिशेने जाणारी स्कूल बस हॅरिस पुलावर मधोमध पेटल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काही वाहनचालकांनी मुंबईकडे जाणाऱ्या बाजूने वाहने पुढे दामटण्याचा प्रयत्न केल्यामुळे दुसऱ्या बाजूलाही वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दुपारी तीनपर्यंत या परिसरातील वाहतूक अत्यंत मंदगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत होते. आधीच प्रचंड उकाडा आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक प्रवाशांचे प्रचंड हाल झाले