ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

माजी नगरसेवक सदगुरु कदमसह ११ जण अटकेत

पिंपरी, दि. १० - राजकीय वैमनस्यातून १२ जणांच्या टोळक्याने डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून एकाचा निर्घृण खून केला. पिंपरीच्या खराळवाडीत दुर्जगामाता मंदिराजवळ आज (रविवारी) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी काँग्रेसच्या माजी नगरसेवक सद्गुरु कदम याच्यासह एकूण ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

सुहास बाबूराव हळदणकर (वय ३५, दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी, स्पाईन रो़ड, चिखली) असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहेयाप्रकरणी काळ्या उर्फ संदीप कलापुरे (वय ३०), प्रतुल घाडगे (३६) , अभिजित कलापुरे (२८) , सदगुरू कदम (४५), दत्ता उर्फ फेटया कलापुरे (२५), प्रवीण कदम उर्फ झिंगऱ्या (२८), खंड्या उर्फ प्रवीण सावंत (२६), गणेश जाधव (२५), छोट्या पठाण (२८), संतोष उर्फ बाब्या कदम (२८), संतोष उर्फ मुंड्या आरबेकर (४०), सतीश कदम (३१, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश जाधव सोडून सर्वांना अटक करण्यात आली आहे

हळदणकर हे उर्दू शाळेजवळ दुर्गामाता मंदिरासमोर मित्रांसमवेत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी १२ जणांचे टोळके त्या ठिकाणी आले. त्यांनी जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी असलेले सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून हळदणकर यांचा खून केला. महापालिका निवडणुकीच्या काळात झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

हळदणकर यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केलेया प्रकारानंतर संतप्त जमावाने किरकोळ दगडफेकही केली, मात्र पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, मात्र पोलिसांनी दगडफेक लाठीमार झाल्याचा इन्कार केला आहे.