ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

माजी नगरसेवकासह ११ जण हत्येप्रकरणी अटकेत

पिंपरी, दि. ११ - पिंपरी-चिंचवडमध्ये सुहास हळदणकर हत्येप्रकरणी माजी नगरसेवक सदगुरु कदमसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. खराळवाडीत राहणाऱ्या सुहास हळदणकर यांची सिमेंटचं पोतं डोक्यात घालून हत्या करण्यात आली होती.

सुहास हळदणकर देखील काँग्रेसचे माजी नगरसेवक सदगुरु कदम यांचाच कार्यकर्ता होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यानं कदमांची साथ सोडली होती. त्यानंतर सुहासने महापालिकेच्या बालभवन येथे असणारे सुरक्षारक्षक हटवण्याची मागणी केली.

याच रागातून सुहासची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. हत्येनंतर खराळवाडी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.