ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लोकअदालतमध्ये थकबाकीदारांचा निवाडा, साडेआठ लाख रुपये जमा

पिंपरी, दि. ११ - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर थकविणा-या ६० जणांचा निवाडा करण्यात आला. त्यातून त्यांनी मालमत्ता करापोटी लाख ३१ हजार रुपये महापालिका तिजोरीत जमा केले. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आकुर्डी येथील कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात ही लोकअदालत घेण्यात आली होती. न्यायाधीश . . धुमकेकर, महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे, कायदा अधिकारी सर्जेराव लावंड, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे ॅड. किरण पवार, ॅड. सुनील कड, प्रशासन अधिकारी नाना मोरे आदी यावेळी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवड महापालिका करसंकलन विभाग पाणीपुरवठा विभागाकडील कर भरण्यास टाळाटाळ करणा-या चारशे थकबाकीदारांना दिवाणी न्यायाधीशांमार्फत नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये रस्ता रुंदीकरणात पाडलेल्या इमारती, प्राधिकरण संपादित मिळकती, बंद कंपन्या आदी कर भरणा करण्यास असर्मथता दर्शविणा-या थकबाकीदारांच्या तक्रारींचे निरसन करण्यात आले. या लोकअदालतीमध्ये सुनावणीदरम्यान उपस्थित असलेल्या ६० थकबाकीदारांचा निवाडा करण्यात आला. त्यात त्यांनी मालमत्ता करापोटी   लाख ३१ हजार रुपये महापालिका तिजोरीत जमा केले.