ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

समता निर्माण करण्यासाठी प्रयत्न गरजेचे - राजकुमार बडोले

पिंपरी, दि. १२ - समताधिष्टीत समाजाची निर्मिती करण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी प्रयत्न केले. या महापुरुषांनी सांगितलेली समता निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चौक येथे आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार लक्ष्मण जगताप,  गौतम चाबुकस्वार, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, आयुक्त दिनेश वाघमारे, माजी महापौर नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेविका निकिता कदम, सुलक्षणा शीलवंत तसेच  माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, मारुती भापकर, लक्ष्मण गायकवाड, सह शहर अभियंता तथा मुख्य संयोजक रविंद्र दुधेकर, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड, अनिल सूर्यवंशी, वैद्यकीय संचालक पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी रवींद्र खिलारे, सामाजिक कार्यकर्ते अशोक शीलवंत, गणेश भोसले आदी उपस्थित होते. 

राजकुमार बडोले म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार तेवत ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या या भव्य स्वरूपातील जयंती महोत्सवाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. महात्मा फुले डॉ. आंबेडकरांसारख्या महापुरुषांमुळेच हा देश जिवंत आहे. अंधश्रद्धा जीर्णरूढी परंपरा त्यांनी त्याकाळी तोडल्या. समता, स्वातंत्र्य बंधुता यांचा विचार घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला

 

देशातील सामाजिक आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आपण प्रयत्न