ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बायोमेट्रीक अटेंडंस नावाला, नगरसेवक सह्याजीरावच

पिंपरी, दि. १३ - पारदर्शक कारभाराचा गाजावाजा करत पिंपरी महापालिकेची सत्ता काबीज करणा-या भाजपची भंपकबाजी चव्हाट्यावर आली आहे. दांडीबहाद्दर नगरसेवकांना लगाम लावण्यासाठी बायोमेट्रीक पद्धतीचा अवलंब करु असे सांगणा-या भाजप धुरीणांना महापालिका आयुक्तांनी चांगलीच चपराक लगावली आहे. बायोमेट्रीक अटेंडंस पद्धतीची तरतूद कायद्यात नसल्याने प्रचलित पद्धतीनुसार हजेरीपत्रकावर नगरसेवकांच्या स्वाक्ष-या घेतल्या जातील. राज्य सरकारच्या मान्यतेनंतरच थंब इप्रेंशन आणि फेस रिडींग अनिवार्य करण्यात येईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळे बायोमेट्रीक पद्धती नामधारीच रहाणार आहे.   

पिंपरी पालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपने सर्वपक्षीय नगरसेवकांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभांना हजर राहणा-या नगरसेवकांची बायोमेट्रिक पद्धतीने थम्ब इंप्रेशन आणि फेस रीडिंग घेण्याचे निश्चित केले. त्याबाबतचा प्रस्ताव भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिला. नगरसचिव उल्हास जगताप यांनी या प्रस्तावाची कायदेशीर बाब आणि तांत्रिक व्यवहार्यता तपासली.  

महापालिका सर्वसाधारण सभा आणि इतर विषय समित्यांचे कामकाज महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार होते. या अधिनियमातील सभा संचलनाच्या जादा नियमामधील तरतुदीनुसार सभांचे आयोजन केले जाते. परंतु, या नियमांमध्ये सभांना उपस्थित राहणा-या नगरसेवकांची हजेरी नोंदविण्यासाठी स्वयंस्पष्ट तरतूद नाही. त्यामुळे सभांना उपस्थित राहणा-या नगरसेवकांची हजेरीपत्रकावर स्वाक्षरी घेऊन उपस्थिती नोंदविण्यात येते. ही पद्धत इतर सर्व महापालिकांमध्ये सर्वमान्य असल्याचा त्यांचे म्हणणे आहे 

माहिती-तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रात प्रभावी वापर होत आहे. त्याचा वापर सभा कामकाजासाठी केल्यास कामकाजातील त्रुटी कमी करता येणे शक्य आहे. सर्वसाधारण सभांवेळी नगरसेवकांची हजेरी नोंदविताना हजेरीपत्रकावर सही घेण्याऐवजी बायोमेट्रिक पद्धतीने सभेला येताना आणि जाताना थंब इम्प्रेशन आणि फेस रीडिंग तंत्रज्ञानाच्या सहायाने नगरसेवकांची उपस्थिती नोंदविल्यास सभेला निश्चित वेळेत उपस्थित राहणे प्रत्येक नगरसेवकाला अनिवार्य राहिल 

एका कामकाजाच्या दिवशी सभा एकापेक्षा अधिकवेळा तहकूब करण्यात आल्यास पहिल्या सभेपूर्वी आण