ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दारू विक्रेत्यांवर महापालिका प्रशासन मेहरबान

पिंपरी, दि. १३ - पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यभागातून जाणा-या जुन्या पुणे-मुंबई महामार्गासह पालखी मार्गावरील सर्व दारू दुकाने पुन्हा एकदा उघडणार आहे. दारू विक्रेत्यांच्या दबावापुढे झुकत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राष्ट्रीय मार्ग - महामार्गाचे वर्गीकरण महापालिका हद्दीत करण्याचे मनसुभे रचले आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे सादर केला आहे.

पुणे - मुंबई रस्ता (दापोडी ते निगडी), औंध-रावेत रस्ता (मुकाई चौक ते राजीव गांधी पूल) देहू-आळंदी रस्ता आणि दिघी-आळंदी रस्ता हे महापालिका हद्दीतून जाणारे राष्ट्रीय-राज्य महामार्ग आहेत. यांची देखभाल - दुरुस्ती, विकसन आणि सुधारणा कामे महापालिकेमार्फत करण्यात येतात. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च २०१७ रोजी हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत. तर, नाशिक फाटा ते मोशी रस्ता आणि किवळे - मामुर्डी ते वाकड येथील मुळा नदीवरील पूलपर्यंतचा रस्ता (पश्चिम बाह्यवळण मार्ग) हे दोन राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित केले नाहीत. 

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आत दारू विक्रीला मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने पुणे-मुंबई रस्ता, औंध-रावेत रस्ता हे दोन राष्ट्रीय महामार्ग, देहू ते आळंदी रस्ता आणि दिघी ते आळंदी रस्ता हे दोन राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. परंतु , महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने शहरातून जाणारे सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर महापालिका सर्वसाधारण सभेचे शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या दुतर्फा असणा-या दारू दुकानांचे शटर पुन्हा उघडले जाणार आहे.ो