ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिकेचे जेएनएनयुआरएमसह ४ हजार ८०५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

पिंपरी, दि. १८ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे जेएनएनयुआरएमसह हजार ८०५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (मंगळवारी) स्थायी समितीसमोर सादर केले. कोटी ९९ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविण्यात आली नाही.

महापालिका मुख्यालयातील तिस-या मजल्यावरील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात सकाळी अकरा वाजता स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह आयुक्त दिलीप गावडे, स्थायी समिती सदस्य आदी उपस्थित होते. अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी मंगळवार (दि.२५) पर्यंत स्थायी सभा तहकूब करण्यात आली आहे. 

अंदाजपत्रकामध्ये प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी ५० कोटी, अमृत योजनेसाठी ३६.३५ कोटी, स्मार्ट सिटीसाठी ४९.५० कोटी, स्वच्छ भारत मिशनसाठी ९७ कोटी, नगररचना भू-संपादनकरीता १३७ कोटी, पीएमपीएमलसाठी १३५ कोटी, पाणी पुरवठा विशेष निधी ७०.५० कोटी, अपंग कल्याणकारी योजनेसाठी २०.४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी ४८.३२ कोटी तरतूद केली आहे. मागासवर्गीय योजनांसाठी ५३.७७ कोटी, अपंग कल्याणकारी योजना २०.४२ कोटी आणि क्रिडा निधीसाठी ३३.६३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या जल:निसारण विभागासाठी ९७ कोटी तरतूद, पालिकेतील सामाविष्ट, गावात ३२.११ किलो मीटर जल:निसारण नलिका टाकणे, झोपडपट्टी क्षेत्रात १४.२७ किलो मीटर नवीन जल:निसारण टाकणे, चिंचवडगाव थेरगाव यांना जोडणा-या पवनानदीवर २८ कोटीचा बटर फ्लाय ब्रीज, चिंचवडगाव येथे ५० लाखांचे दुमजली वाहनतळ उभारणार, भोसरी येथे १२. कोटीचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र करणार, कै. अण्णासाहेब मगर स्टेडीयम हे बालेवाडी क्रीडानगरीच्या धर्तीवर अद्यावत, अजमेरा कॉलनी, थेरगाव आणि आकुर्डी येथे सुसज्ज रुग्णालय उभारणार, थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवचरित्रावर आधारीत 'म्युरल्स' उभारणार, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय आणि सखुबाई गवळी उद्यानात रंगीत कारंजे, मासूळकर कॉलनी खराळवाडी येथे मोठी उद्याने, रावेत येथे बास्केट ब्रिजला लागून नवीन बंधारा बांधणार, आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न, चिखली बोपखेल येथे मैलाशुद्धीकरण केंद्र आदी तरतुदी करण्यात येणार आहेत.