ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक निलंबित

पिंपरी, दि. २० - महापालिका सर्वसाधारण सभेत १०० टक्के शास्तीकर माफ करण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर गोंधळ घालणारे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना पुढील तीन सर्वसाधारण सभांसाठी आज (गुरुवारी) निलंबित करण्यात आले. निलंबन कारवाईनंतर सभागृहाबाहेर पडणाऱ्या महापौर नितीन काळजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. निलंबन कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे 

विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम तसेच नगरसेवक दत्ता साने मयूर कलाटे अशी निलंबित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नावे आहेत. 
पिंपरी महापालिकेत आज सर्वसाधारण सभेच्या वेळी शास्तीकराचा प्रश्न विषयपत्रिकेवर असताना, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी १०० टक्के शास्तीकर माफ करण्यात यावा यासाठी महापौरांच्या आसनासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी भाजप नगरसेवकांनी देखील घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ होऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी शास्तीकराच्या १०० टक्के माफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे विरोधी पक्षनेते योगेश बहल, मंगला कदम, मयूर कलाटे दत्ता साने या चारही नगरसेवकांवर पुढील तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आले.