ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिका कार्यक्षेत्रात आता आठ क्षेत्रीय कार्यालये

पिंपरी, दि. २१ - पिंपरी-चिंचवड महापालिका सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या फेररचना प्रस्तावाला विरोध करत सत्तारुढ भाजपने क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठ केली आहे. त्यासाठी लोकसंख्येचे कारण पुढे केले आहे. नव्या दोन क्षेत्रीय कार्यालयामुळे भाजपच्या नगरसेवकांची राजकीय सोय होणार असली तरी महापालिकेच्या सेवकखर्चात, महसूली खर्चात वार्षिक दोन कोटी रुपयांची वाढ होणार आहे. 

महापालिका प्रशासकीय कामकाजासाठी १९९७ मध्ये चार क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन क्षेत्रीय  कार्यालयांची निर्मिती केली. गेल्या पाच वर्षांपासून महापालिका मुख्यालय आणि सहा क्षेत्रीय कार्यालयांतून प्रशासनाचा गाडा चालविला जातो.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभागपद्धतीने नुकतीच झाली. त्यानुसार ३२ निवडणूक प्रभाग झाले. या प्रभाग रचनेमुळे सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मोठे बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये, नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे यासाठी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करण्याचे ठरविले. त्याबाबतचा प्रस्ताव गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला.

त्यावेळी भाजपने आठ क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्याची उपसूचना मांडत विनाचर्चा मंजूरी दिली. 

आठ क्षेत्रीय कार्यालयांची रचना!

'' क्षेत्रीय कार्यालय, भेळ चौक, प्राधिकरण निगडी

) प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), ) प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी ),  ) प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण),  ) प्रभाग क्रमांक १९ (आनंदनगर, भाटनगर)

 

'' क्षेत्रीय कार्यालय,  एल्प्रो कंपनी आवार, चिंचवडगाव  

) प्रभाग क्रमांक १६ (रावेत),   ) प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर),   ) प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड),  ) प्रभाग क्रमांक २२ (काळेवाडी) 

'' क्षेत्रीय कार्यालय, हॉकी स्टेडीयमजवळ, नेहरुनगर       

 ) प्रभाग क्रमांक   (बो-हाडेवाडी),   ) प्रभाग क्रमांक  (धावडेवस्ती),  ) प्रभाग क्रमांक  (इंद्रायणीनगर), ) प्रभाग क्रमांक (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा) 

'' क्षेत्रीय कार्यालय,  औंध - रावेत रस्ता,   रहाटणी     

) प्रभाग क्रमांक २५ (वाकड), ) प्रभाग क्रमांक २६ (पिंपळे निलख),  ) प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर), ) प्रभाग क्रमांक २९ (पिंपळे गुरव) 

Posted On: 21 April 2017