ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नगरसेवक पद रद्द करुन दाखवाच - दत्ता साने

पिंपरी, दि. २२ - शास्तीकर, रेडझोन या प्रश्नांसाठी गेल्या १० वर्षांपासून मी भांडत आलो आहे. महापालिकेच्या सभागृहात गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच आवाज उठविला आहे. १०० टक्के शास्तीकर माफ करण्याची मागणी करत असताना महापौरांनी आमचे निलंबन केले असून भाजपने माझे नगरसेवक पद रद्द करुन दाखवावेच, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी दिले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत १०० टक्के शास्तीकर माफ करण्याच्या मागणीसाठी महापौरांच्या आसनाशेजारील कुंडी वरती ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे दत्ता साने यांचे नगरसेवकपद रद्द करणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता दत्ता साने यांनी नगरसेवक पद रद्द करुन दाखवण्याचे भाजपला खुले आव्हान दिले आहे. 

मी सभागृहात कोणतेच गैरवर्तन केले नाही. महापौरांच्या आसनाशेजारील कुंडी वरती ठेवण्याचा प्रयत्न केला. राजदंड पळवून नेल्यास गैरवर्तन होते, मी राजदंडाला हातदेखील लावला नाही. १०० टक्के शास्तीकर माफ करावा, या मागणीसाठी मी गेल्या १० वर्षापासून झगडत आहे. आम्ही मतदान मागत असताना महारौपांनी आमची मागणी मान्य केली नाही. यामध्ये कुरघोडीचा कोणताही प्रयत्न नव्हता आमचा प्रामाणिक प्रयत्न होता, असेही दत्ता साने म्हणाले. 

मी जनतेचा नगरसेवक आहे. लाटेत निवडून आलो नाही. जनतेसाठी माझे दहावेळेस नगरसेवक पद रद्द केले, तरी मला काहीच फरक पडत नाही. जनता माझ्यासोबत आहे. नगरसेवक पद रद्द करणे सोपे नाही. त्याच्यावर मला न्यायालयात सुद्धा जाता येते. 

भाजपला सभागृहात बोलणारे नगरसेवक नकोच आहेत, असेही साने म्हणाले. तसेच भाजपच्या ज्येष्ठ महिला नगरसेवकांनी 'कडेवर' उचलून घ्या म्हणणे, गैरवर्तन नाही का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.