ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी, दि. २२ - कामगारनगरी म्हणून ओळख असणा-या पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक वारसा जपणे त्याचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पिंपळे-गुरवमध्ये सुसज्ज असे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

शहरात महापालिकेच्या वतीने चिंचवडमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकाराम नगरमध्ये आचार्य अत्रे नाट्यगृह तर भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृह बांधण्यात आली आहेत. पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरामधील नागरीकांना त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी इतर भागात जावे लागत होते. ही गरज ओळखून महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथील आरक्षण क्र. ३४५ च्या सुमारे ३५०२ चौ. मी. क्षेत्रावर भव्यदिव्य असे नाटयगृह उभारण्यात आले आहे. याचे काम ९० टक्के पुर्ण झाले असून विद्युत विषयक साऊंड सिस्टिमचे काम बाकी आहे. 

महापालिकेने सुमारे ३५ कोटी रूपये खर्च करत शहरातील सर्वाधिक भव्यदिव्य असे हे नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहाचे उद्घाटन येत्या काही दिवसात होणार आहे. नाट्यगृहाचे आर्किटेक्ट मिलिंद किरदत तर ठेकेदार बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेन्क्रो. प्रा. लि. यांनी हे काम केले आहे, अशी माहिती बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.