ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्थायीच्या कारभाराची सीआयडी चौकशी करा - मारुती भापकर

पिंपरी, दि. २२ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत ऐनवेळचे, वाढीव खर्चाचे विषय आणि ठेकेदारांची बिल अडविण्याच्या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषन विभाग (सीआयडी) मार्फेत चौकशी करण्याची मागणी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच ठक्केवारीसाठी ठेकेदांराची बिले अडविल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत भापकर यांनी पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भय, भ्रष्टाचार मुक्त महापालिका आणि पारदर्शक कारभाराची भाजपने घोषणा केल्याने शहरातील जनतेने आपल्या पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली 

सीमा सावळे यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताच आपल्याला टक्केवारी माहीतच नसल्याचे सांगितले होते. ऐनवेळचे, वाढीव खर्चाचे विषय स्विकारणार नसल्याचे, जाहीर केले होते. अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांची साखळी उद्धवस्त करु असेही, त्यांनी सांगितले होते 

पंरतु, स्थायीच्या दुस-याच सभेत त्यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडला. बुधवारी (दि.१२) झालेल्या स्थायीच्या सभेत प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी सल्लागार नेमण्याचा सव्वा कोटीच्या ऐनवेळच्या विषय मंजूर केला आहे. तर, याच सभेत स्मार्ट सिटीचा सल्लागार नेमण्याचा 'क्रिसिल' संस्थेचा विषय लांबणीवर टाकण्यात आला होता. या संस्थेमुळे अनेक प्रकल्पांचे नुकसान झाल्याचे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले होते. त्यानंतर बुधवारी (दि.१९) झालेल्या स्थायी सभेत 'क्रिसिल'ची सल्लागार पदी नेमणूक करण्याच्या ६३ लाख २५ हजार रुपयांच्या विषयाला मंजूरी देण्यात आली. तसेच याच सभेत वाढीव खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे 

आर्थिक वर्ष संपल्याचे कारण पुढे करत भाजप पदाधिका-यांच्या सांगण्यावरुन महापालिकेच्या मुख्य लेखापालांनी ठेकेदारांची बिले अडवून ठेवली आहेत. ठेकेदारांची बिले अदा करताना ज्या कामांना रीतसर मंजूरी मिळालेली आहे. जी कामे मंजूर झाली असून पैशांची तरतूद आहे, अशी बिले कुठेही Posted On: 22 April 2017