ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

नवे पालिका आयुक्त श्रवण हार्डीकर, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार

पिंपरी, दि. २४ - पिंपरी-चिंचवड शहरातील पवना जलवाहिनी, बीआरटी, मेट्रो, स्मार्ट सिटी, झोपडपट्टी पुनर्वसन असे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेले श्रवण हार्डीकर यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली असून ते शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार का, याबाबत उत्सुकता आहे. 

मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मे २०१६ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होतावाघमारे यांनी फक्त अकरा महिने २० दिवस महापालिकेत काम केले. एका वर्षाच्या आतच त्यांची राज्य सरकारने मंत्रालयात समाज कल्याण विभागात  सचिवपदावर  पदोन्नतीवर बदली केली आहे. त्यांच्या जागी डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेले नागपूरचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांची नियुक्ती झाली आहे.

मावळते आयुक्त वाघमारे यांच्याकडे विकासाचे कसलेच धोरण नव्हते. गेल्या वर्षभरात त्यांनी एकही भरीव काम केले नाही. प्रशासनावर त्यांची कसलीच पकड राहिली नव्हती. आला दिवस ढकला, हीच आयुक्तांची कार्यपद्धती सुरू होती. कोणत्याही कामात त्यांनी पुढाकार घेतला नाही. विकासकामे करून स्वत:ची छाप पाडण्याचा प्रयत्न देखील ते करताना दिसले नाहीत. त्यांच्या कार्यकाळात एकही असा मोठा प्रकल्प शहरात मार्गी लागला नाही. 

तत्कालीन Posted On: 24 April 2017