ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मंत्रिपदासाठी आमदार जगताप-लांडगे यांच्यात रस्सीखेच

पिंपरी, दि. २६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपकडे खेचून आणण्यात शहराध्यक्ष   आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे या जोडीने जबरदस्त राजकीयफिल्डिंगलावली होती. एकदिलाने केलेल्या प्रयत्नांमुळे निवडणुकीत यशही मिळाले. मात्र, आता या दोन्ही आमदारांमध्ये मंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या २६   २७ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीगण, खासदार, आमदार आणि प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष असे आठशे ते एक हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

यानिमित्त शहर भाजपने जोरदार फ्लेक्सबाजी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या काळात आमदार जगताप आणि लांडगे यांच्यापैकी जो जास्त नगरसेवक निवडूण आणेल त्याला मंत्रीपद मिळेल, असे आश्वासन दोघांनाही दिले होते. त्यातच आता मे महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आपल्यालाच मंत्रीपदाची संधी मिळावी. यासाठी दोन्ही आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपचा प्रभावी चेहरा अशी ओळख निर्माण केली आहे. तसेच, आळंदी, खेड आणि राजगुरुनगर, जुन्नर आदी नगरपरिषदांमध्ये भाजपच्या दैदीप्यमान यशात आमदार लांडगे यांचा वाटा मोठा आहे. दुसरीकडे, क्रीडा क्षेत्रात राज्यभर लौकीक असल्यामुळे आमदार लांडगे मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात.

 

आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आपला अनुभवपणाला लावून महापालिकेत भाजपला सत्ता मिळवून दिली आहे. जगताप यांना मानणारा नगरसेवकांचा मोठा गट आहे. मंत्रीपदाच्या चर्चेनंतर शहर भाजपमध्ये आता आमदार जगताप आणि आमदार लांडगे असे दोन गट निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि राज्यातील अन्य मंत्र्यांसोबत आमदार लांडगेंची जवळीक आहे. त्यामुळे जगताप गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचेलॅपटॉप मॅनसारंग कामतेकर आणि आमदार महेश लांडगे यांचेचाणक्यबंधू कार्तिक लांडगे यांनी आपआपल्या परीनेब्रॅण्डिंगसुरू केले आहे. 

महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयात आमदार लांडगे यांचा मोठा वाटा Posted On: 26 April 2017