ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रूग्णालयांसाठी औषधे दोन टक्के जादा दराने खरेदी करणार

पिंपरी, दि. २६ - महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासह इतर रूग्णालये आणि दवाखान्यांसाठी औषधे साहित्याची खरेदी करण्यात येते. रूग्णांना विविध प्रकारची तातडीक औषधे किंवा साहित्याची आवश्यकता असते. अपवादात्मक परिस्थितीत लागणारी ही औषधे खरेदी करण्यासाठी औषध पुरवठा करणा-या पिंपरीतील एजन्सीसमवेत दोन वर्षे कालावधीकरिता करारनामा करण्यात येणार आहे. मात्र, ही औषध खरेदी मागील खरेदीपेक्षा दोन टक्के जादा दराने करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयास आवश्यक औषधे किंवा साहित्याचा पुरवठा मध्यवर्ती औषध भांडाराकडून करण्यात येतो. यासाठी रूग्णालयाची औषधे किंवा साहित्याची वार्षिक मागणी मध्यवर्ती औषध भांडाराकडे आगाऊ नोंदविण्यात येते. रूग्णालयात विविध गंभीर आजारांचे आणि अपघातग्रस्त रूग्ण दाखल होत असतात. रूग्णांना विविध प्रकारची तातडीक औषधे किंवा साहित्याची आवश्यकता असते. तथापि, अपवादात्मक परिस्थितीत रूग्णांसाठी आवश्यक औषधे किंवा साहित्याचा पुरवठा मध्यवर्ती औषध भांडाराकडून होत नाही. त्यामुळे वायसीएम रूग्णालयातील औषध भांडारात शिल्लक नसणारी तसेच मध्यवर्ती औषध भांडाराकडील निविदेत समाविष्ट नसणारी औषधे रूग्णालय पातळीवर दक्षता म्हणून खरेदी करण्यात येतात. 

वायसीएम रूग्णालयामार्फत तातडीने आवश्यक औषधे किंवा साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाते. औषधे किंवा साहित्याच्या उत्पादीत किमतीवर किती सुट देणार, या धर्तीवर निविदा मागविण्यात येतात. निविदा मुदत दोन वर्षाकरीता असते. यापुर्वीची निविदा ब्रॅण्डेड औषधांच्या किमतीवर .२५ टक्के, जेनेरिक औषधांच्या किमतीवर ५२ टक्के आणि सर्जीकल साहित्याच्या किमतीवर ४३ टक्के सवलत या दराने स्विकृत करण्यात आली होती. याच निविदाप्राप्त दराने वायसीएम रूग्णालयासह महापालिकेची इतर रूग्णालये किंवा दवाखाने यांच्याकडून अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यक औषधे किंवा साहित्याची खरेदी करण्यात येते. त्याची तरतुद वायसीएम रूग्णालयाकडून रूग्णालयाच्या अर्थसंकल्पातील 'औषध खरेदी' या लेखाशिर्षातून करण्यात येते. 

महापालिकेची इतर रूग्णालये, दवाखाने यांनी खरेदी केलेल्या तातडीक औषधे किंवा साहित्य रकमेची तरतुद मुख्य औषध भांडाराकडील 'औषध खरेदी' या लेखाशिर्षातून दाखविण्यात येते. या निविदेची मुदत डिसेंबर २०१६ पर्यंत होती. या आदेशास पुढील निविदा कार्यवाही पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ घेण्यात आली आहे. Posted On: 26 April 2017