ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिकेच्या ४ हजार ८०५ कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी

पिंपरी, दि. २६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या ४ हजार ८०५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समिती सभेत मंगळवारी (दि. २५) मंजुरी देण्यात आली. कामांची आवश्यकता तपासून आणि उपलब्ध तरतुदींचा विचार करून अर्थसंकल्पासाठी मांडलेल्या उपसूचनांवर पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

या अर्थसंकल्पात लोणावळा ते पुणे लोकल रेल्वेचा तिसरा मार्ग तयार करणे, मुदतीत बांधकाम करणाऱ्यांना आकारण्यात येणारा दंड, सीएसआर फंड, संशोधन विकास आणि अंध अपंग मध्यवर्ती केंद्र यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सीमा सावळे यांनी दिली. 

महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी १८ एप्रिल रोजी स्थायी समितीला २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. मूळ हजार ४८ कोटींचा आणि जेएनएनयुआरएम केंद्र शासनाच्या इतर योजनांसह हजार ८०५  कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये कोणतीही वाढ करता हजार ८०५  कोटींचाच अर्थसंकल्प स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला. सभेत अर्थसंकल्पासाठी सदस्यांनी मांडलेल्या उपसूचनांची कामांची आवश्यकता तपासून आणि उपलब्ध तरतुदींचा विचार करून पुढील कार्यवाही करण्याची सूचना सावळे यांनी प्रशासनाला केली आहे.

 या अर्थसंकल्पात लोणावळा ते पुणे तिसरा लोकलमार्ग तयार करण्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. त्याशिवाय मंजूर बांधकामापेक्षा जास्त बांधकाम केल्यास आकारण्यात येणारी दंडाची रक्कम, देश-विदेशातील चांगल्या प्रकल्पांची अधिकाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी संशोधन विकास, सीएसआर फंड, अंध अपंगासाठी शहरात मध्यवर्ती केंद्र यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यासही मंजुरी देण्यात आल्याचे सीमा सावळे यांनी सांगितले

 

मंजूर बांधकामापेक्षा जास्त बांधकाम केल्यास आकारण्यात येणारे दंड विकास शुल्कात समावेश केला जात होता. त्यामुळे कोणाकडून दंड वसूल केला हे कळत नव्हते. मात्र आता स्वतंत्र लेखाशीर्ष तयार होणार असल्याने Posted On: 26 April 2017