ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी पालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी स्वीकारला पदभार

पिंपरी, दि. २७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नव नियुक्त आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी आज (गुरुवारी) सकाळी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहाय्यक आयुक्त महेश डोईफोडे, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे उपस्थित होते.

राज्य सरकारने २२ एप्रिल रोजी राज्यातील सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची मंत्रालयात समाज कल्याण विभागात सचिव पदावर पदोन्नतीवर बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

श्रवण हर्डीकर यांनी गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दिनेश वाघमारे फिरकलेच नाहीत पालिकेत 

पिंपरी-चिंचवडचे मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहाय्यक लघुलेखक राजेंद्र सोपान शिर्के यांना सोमवारी एका बिल्डरकडून १२ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शिर्के यांनी नेमकी कोणाच्या सांगण्यावरुन लाच स्वीकारली असा सवाल उपस्थित करत लाखचोर प्रकरणाचे आयुक्त वाघमारेच खरे सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच त्यांची चौकशी करुन त्यांची पदोन्नती थांबविण्याची मागणी केली आहे. बदली झाल्यानंतर पदभार सोडलेला नसतानाही आयुक्त वाघमारे महापालिकेत आलेच नाहीत. नवीन आयुक्तांकडे पदभार देण्यासाठीही वाघमारे पालिकेत फिरकले देखील नाहीत.