ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपचा चेहरा असणारे आयुक्त वाघमारे हेच खरे सूत्रधार - मंगला कदम

पिंपरी. दि. २७ - भय, भूक, भ्रष्टाचारापासून सर्वसामान्य जनतेची सुटका करून स्वच्छ, पारदर्शक कारभाराची हमी देऊन सत्तेवर आलेल्या भाजपचे हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले असल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहाय्यक शिर्के १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. हे भाजपच्या भ्रष्ट कारभाररुपी हिमालयाचे केवळ एक टोक आहे, अशी खरमरीत टीका माजी महापौर नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहाय्यक लघुलेखक शिर्के एका बांधकाम व्यावसायिकाकडून १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. या पार्श्वभूमीवर मंगला कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली.

स्वच्छ कारभाराची हमी देणा-या भाजपच्या दुटप्पी वर्तनावर बोट ठेवत कदम यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. लाचखोर शिर्के यांचा गॉडफादर कोण आहे सगळ्यांनाच माहित आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांना मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतला माणूस समजले जाते. महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी त्यांची खास नेमणूक येथे करण्यात आली होती. भाजपला हवे ते साध्य करुन झाल्यावर त्याचे बक्षीस म्हणून त्यांची पुन्हा एका वर्षातच पदोन्नतीवर बदली करण्यात आली ती पदोन्नती या लाचखोर प्रकरणामुळे  रद्द करुन त्याची चौकशी चालू करावी, अशी मागणीही मंगला कदम यांनी केली आहे. तसेच या मर्जीतल्या माणसाचा खरा चेहरा या प्रकरणातून उघडा झाला असून भाजपचे स्वत:चेच हात स्वच्छ कारभाराआड भष्ट्राचाराने बरबरटलेले आहेत, असेही मंगला कदम म्हणाल्या आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विकास कामांचे श्रेय लाटणा-या भाजपने महापालिका निवडणुकांपासूनच अत्यंत नियोजनबद्धरितीने स्वत:ची कार्यपद्धती राबवायला सुरुवात केली होती. भाजपला अनुकूल फायदेशीर ठरेल अशाच पद्धतीने प्रभाग रचना त्यांच्याकडून करून घेतली. 

आयुक्त दिनेश वाघमारे यांनी भाजपला विजयी करण्यासाठी आपली सारी शक्ती, प्रतिष्ठा पणाला लावली होती. सर्वसामान्य जनतेला आपले गोंडस Posted On: 27 April 2017