ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभारावर भर - आयुक्त हर्डीकर

पिंपरी, दि. २८ - स्वच्छ, गतीमान, कार्यक्षम प्रशासन, पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनावर भर देणार आहे. काम करून देण्यासाठी कोण लाच मागत असेल तर कोणालाही घाबरता बिनधास्तपणे त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध (एसीबीकडे) करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. पिंपरी-चिंवड महापालिका आयुक्त पदाचा पदभार हर्डीकर यांनी गुरुवारी स्वीकारला.  

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, प्रशासकीय शिस्त लावण्यात येईल. प्रशासनाने गतीमान काम केले पाहिजे. वेळेत प्रकल्पांची अंमलबजावणी करावीजनतेला त्याचा लवकरात लवकर उपयोग झाला पाहिजे. शहराचा 'स्मार्ट' सिटीत समावेश झाला आहे. मेट्रोच्या कामाचे 'सर्व्हेक्षण' झाले आहे. वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर देणार आहे. मेट्रो संपूर्ण प्रवास व्यवस्थेचा भाग आहे. मेट्रो, बीआरटीएस, पीएमपीएमएलला महापालिकेची जी मदत लागणार आहे, ती मदत करण्यात येईल. वाहने वाढत आहेत. वाहनांसोबत प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक वाहतूक करण्यावर भर दिला जाईल.

पुणे-पिंपरी-चिंचवड शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन नवीन पार्किंग पॉलिसी बनविण्यात येईल. पाणी, पुरवठा, कचरा व्यवस्थान, दिवा बत्ती अशा विविध प्रश्नांसह महापालिकेचे कर्तव्य पार पाडली जातील, असेही ते म्हणाले. 

जन संवाद साधण्यावर आपला भर असणार असल्याचेही ते म्हणाले. नागरिकांच्या अपेक्षेपेक्षा चांगले वाटणारे, आपलेसे वाटणारे शहर बनविण्यावर भर दिला जाईल. वेगाने वाढणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे. रोजगारासाठी चांगले शहर असून राहण्यासाठीही चांगले करणार असल्याचे, आयुक्त हर्डीकर म्हणाले. शहर वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अगोदरच नियोजन करून सेवा उपलब्ध केल्या पाहिजेत. त्यासाठी काम केले पाहिजे. पदाधिका-यांना सोबत घेऊन शहराचा विकास करणार आहे. आजी-माजी पदाधिकारी, अनुभवी नेते यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन काम करण्यात येणार असल्याचे, त्यांनी सांगितले. 

'सारथी' हेल्पलाईन शहराचा मानदंड आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनेक नवीन योजना सुरू केल्या होत्या. त्या पुन्हा सुरू करण्यात येतील. कामे वेळेत झाली पाहिजे. वेळेत झाली नाही तर संबंधित अधिकारी त्याला जबाबदार असणार आहे. पारदर्शक कारभार करत असताना भ्रष्टाचार नसला पाहिजे. कोणी लाच मागत असेल तर कोणालाही घाबरता त्याची लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असेही ते म्हणाले. आपली फाईल 'क्लिअर' असल्यावर कोणताही सरकारी बाबू काम अडवू शकत नाही, असेही ते म्हणाले. 

बोपखेलचा पूल बांधण्यासंदर्भातील अडचणी समजून घेतल्या जातील. त्यामधील अडचणींवर तोडगा काढून पूल बांधण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करून अतिक्रमण प्राधान्याने काढले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

Posted On: 28 April 2017