ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अमृतच्या पाणीपुरवठा प्रकल्प खर्चात वाढ

पिंपरी, दि. २८ -  केंद्र सरकारच्या अमृत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरासाठी दोन टप्प्यात पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दहा महिन्यांपूर्वी या प्रकल्प खर्चाला मान्यता देण्यात आली. मात्र, प्रकल्प साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याने या दोन्ही टप्प्यातील खर्चात सुधारणा करण्यात आली आहे. 

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या मंजूर आराखड्यात १२ जुलै २०१६ रोजी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारतर्फे प्रकल्प किमतीच्या ३३.३३ टक्के, राज्य सरकारतर्फे १६.६७ टक्के आणि पिंपरी महापालिकेतर्फे ५० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. परंतु, विविध प्रकारच्या पाईपच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे प्रकल्प साहित्य किंमतीमध्ये वाढ झाली आहे. 

राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीकडून तसेच सरकारकडून प्राप्त झालेल्या दरांच्या मान्यतेच्या अनुषंगाने या पाणीपुरवठा प्रकल्पातील विविध पाईपच्या किमतींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हा दोन टप्प्यात राबविण्यात येणा-या या पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ११८ कोटी ८४ लाख रूपये तर दुस-या टप्प्यात १२५ कोटी २० लाख रूपये सुधारीत खर्च होणार आहे. 

त्यामध्ये पहिल्या टप्प्यात शुद्ध मुख्य जलमापकासाठी १० कोटी, वितरण यंत्रणेसाठी नवीन एचडीपीई आणि डीई पाईपसाठी ५१ कोटी, वितरण यंत्रणेतील एचडीपीई आणि डीई पाईप बदलण्यासाठी ३० कोटी, आरसीसी संप आणि इएसआर साठी १० कोटी ५० लाख, इलेक्ट्रिक कामांसाठी १० कोटी, घरात नळजोड बसविण्याच्या प्रक्रियेकरिता कोटी, वितरण प्रणालीच्या प्रक्रियेसाठी ६८ लाख, डीएमएच्या टप्प्यांसाठी ४३ लाख, इसोलेशन वॉल्वसाठी कोटी आणि पीव्हीआर ९३ लाख रूपये असे एकूण ११८ कोटी ८४ लाख रूपये पहिल्या टप्प्यातील सुधारीत खर्च होणार आहे. 

प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी कार्यादेश दिल्यापासून दोन वर्षाकरिता राहणार आहे. या ११८ कोटी ८४ लाख रूपयांमध्ये केंद्र सरकारतर्फे प्रकल्प किमतीच्या ३३.३३ टक्के Posted On: 29 April 2017