ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कचरा कुंड्या खरेदीचा प्रस्ताव स्थायीने लांबणीवर टाकला

पिंपरी, दि. ५ -  चराचरात कचरा अशी बिकट अवस्था असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाला मात्र लटकत्या कचरा कुंड्या (हॅगिंग लिटरबीन्स) खरेदीचा मोह जडला आहे. कोटी ६४ लाख रुपये खर्चुन पिंपरी-चिंचवड शहरात ५६२ जागी स्टेनलेस स्टीलच्या हॅगिंग लिटरबीन्स बसविण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहेत. या एका कचरा कुंडीचा सरासरी खर्च २९ हजार ३०० रुपये एवढा आहे. दरम्यान, स्थायी समितीने हँगिंग लिटरबीन्सचा प्रस्ताव लटकविला आहे.

 महापालिका हद्दीत दररोज ७४५ मेट्रीक टन कच-याची निर्मिती होते. मोशी कचरा डेपोच्या ८१ एकरावर या कच-याची विल्हेवाट लावली जाते. वाढती लोकसंख्या आणि आधुनिक जीवनशैली पाहता महापालिका परिसरामध्ये निर्माण होणा-या घनकच-याचे व्यवस्थापन ही एक मोठी समस्याच आहे. पिंपरी महापालिकेचा बराचसा भाग हा औद्योगिक क्षेत्राने व्यापलेला असल्याने या परिसरात औद्योगिक कचरा देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. 

वाढते शहरीकरण लोकसंख्या, बदलती जीवनशैली, व्यावसायिक औद्योगिक विस्तार, आयटी क्षेत्रातील वाढ, वाढलेले उपहारगृहे, क्रीडा संकूले, गृहप्रकल्प व्यापारी संकुले आणि जनजागृतीची कमतरता यांच्यामुळे घनकचरा निर्मित समस्यांना चालना मिळत आहे. त्याचबरोबर प्लॅस्टीक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर, औद्योगिक क्षेत्रामुळे -वेस्ट कच-याचे वाढते प्रमाण, त्याच्यावर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक योग्य तंत्रज्ञानाचा आणि जनजागृतीचा अभाव यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रीया प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे.

 नेमकी हीच बाब हेरुन आरोग्य विभागाने नवनवीन शक्कल लढवित 'कच-यातून संपत्तीनिर्मिती'वर भर दिला आहे. घनकचरा व्यवस्थापनावर वर्षाकाठी 50 कोटीहून अधिक रुपये खर्ची पडत असताना आरोग्य विभागाला आता स्टेनलेस स्टीलच्या लटकत्या कचरा कुंड्या (हॅगिंग लिटरबीन्स) खरेदी करावयाच्या आहेत.

शहरात ५६२ ठिकाणी या लटकत्या कुंड्या सिमेंट क्राँक्रीटमध्ये बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी कोटी ७२ लाख रूपयांची निविदा काढण्यात आली. चार ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यामध्ये इंद्रनील टेक्नॉलाजीस या ठेकेदाराने लटकत्या