ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हळदणकर यांचे माहिती अधिकार अर्ज सादर करा - माहिती आयुक्त

पिंपरी, दि. ५ - पिंपरी, खराळवाडीतील माहिती अधिकार कार्यकर्ते सुहास हळदणकर खून प्रकरणाची माहिती आयुक्तांनी दखल घेतली आहे. हळदणकर यांनी कोणत्या प्रकरणाची माहिती पालिकेकडे मागितली होती. याची माहिती देण्याचे आदेश माहिती आयुक्तांनी महापालिकेला दिले आहेत. खराळवाडी येथील हनुमान चौकात एप्रिल रोजी रात्री दहा वाजता सुहास हळदणकर यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी एका माजी नगरसेवकासह ११ जणांना अटक केली होती. 

हळदणकर हे माहिती अधिकार कार्यकर्ते होते. त्यांनी खराळवाडी परिसरातील विविध प्रश्नांवर आवाज उठविला होता. अनेक संवेदनशील प्रश्नांची माहिती मागविली होती. त्यातूनच त्यांचा खून झाला असा आक्षेप हळदणकर यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. 

याबाबत सुहास हळदणकर यांच्या कुटुंबीयांनी पुण्याच्या माहिती आयोगाकडे धाव घेतली होती. चुकीच्या कामांबाबत सुहासने आवाज उठविल्याने त्याचा खून केला आहे. त्याने महापालिकेकडे मागविलेल्या माहितीची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. 

माहिती आयोगाने याची गंभीर दखल घेऊन हळदणकर यांनी पालिकेकडे कोणत्या प्रकरणाची माहिती मागविली होती. याची माहिती देण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने सर्व माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.