ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पालिकेच्या शाळेत कोणाच्या परवानगीने प्रकल्प राबवते - राहुल कलाटे

पिंपरी, दि. ५ - पर्यावरण संवर्धन या खासगी समितीमार्फत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळात कोणत्याही परवानगीविना प्रकल्प राबविले जात आहेत. तसेच समितीचे अध्यक्ष विकास पाटील पालिकेच्या शिक्षकांना दमबाजी करतात. त्यांच्याबाबत प्राथमिक शिक्षक संघाने आपल्याकडे निवेदन दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख पालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये महापालिकेच्या शिक्षण मंडळात पर्यावरण संवर्धन समिती या खासगी संस्थेमार्फत पर्यावरणाचे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. प्रकल्प राबविताना ही खासगी संस्था शिक्षण मंडळ प्रशासनाशी कोणतीही चर्चा करत नाही. चर्चेविनाच प्रकल्प राबविले जात आहेत. भूमकर वस्ती, वाकड येथील महापालिकेच्या शाळेत याचा आपण अनुभव घेतला आहे.

पर्यावरण संवर्धन समिती या खासगीसंस्थेमार्फत कोणताही कार्यक्रम ऐनवेळी व्हॉट्स अॅपवरून सांगितला जातो. मनमानी पद्धतीने शिक्षण मंडळाचे कोणतेही परिपत्रक नसताना परस्पर साहित्य वाटप करणे, पुन्हा जमा करून घेणे, परस्पर स्पर्धा घेणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग'च्या नावाखाली संबंधित विभागाची परवानगी घेता शाळेच्या इमारतीच्या पाइपलाईनमध्ये परस्पर बदल केले जात आहेत. या खासगी संस्थेला असे करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न कलाटे यांनी उपस्थित केला आहे.

शाळेची माहिती किंवा अहवाल मागवणे तसेच शिक्षक, मुख्याध्यापक विद्यार्थ्यांची शाळेच्या वेळेमध्ये बैठक बोलाविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापूर्वी शिक्षण मंडळात पर्यावरण प्रकल्प राबविला जात होता. परंतु, फलनिष्पत्ती अभावी तो बंद करावा लागला होता, असेही कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.