ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्वीकृत नगरसेवकपदी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळणार का

पिंपरी, दि. ६ -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसवेकांची मंगळवारी (दि.) नावे जाहीर होणार आहेत. स्वीकृतपदी आपली वर्णी लागवी, यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरु असून लॉटरी कोणाला लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अशासकीय संघटनेचे (एनजीओ) पदाधिकारी असल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी इच्छुकांची धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये रीघ लागली आहे

मंगळवारी (दि.) सकाळी अकरा वाजता इच्छुकांना नगरविकास कार्यालयात अर्ज जमा करावयाचे आहेत. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे ७७, राष्ट्रवादीचे ३६, शिवसेना , अपक्ष आणि  मनसे असे बलाबल आहे. महापालिकेत १२८ नगरसेवक निवडून येतात, तर पाच स्वीकृत सदस्यांची निवड करता येते. संख्याबळानुसार भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीच्या दोघांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागू शकते

भाजपमध्ये पूर्वीपासून गडकरी आणि  मुंडे असे दोन गट आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहर भाजपमध्ये जुने, नवीन, निष्ठावान आणि आयाराम असा वाद सुरु आहे. निवडणुकीमध्ये अनेक निष्ठावान, जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यापैकी काही जणांना स्वीकृत सदस्यपदी संधी देण्याचे नेत्यांनी आश्वासन दिले होते

स्वीकृत सदस्यपदासाठी अमर मूलचंदानी, भाजपचे संघटन सरचिटणीस माऊली थोरात, शहराध्यक्षांचे भाऊ शंकर जगताप, आमदार महेश लांडगे यांचे भाऊ सचिन लांडगे, विजय फुगे, शांताराम भालेकर, मोरेश्वर शेडगे, प्रदेश सदस्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, सरचिटणीस बाबू नायर, अमोल थोरात, महेश कुलकर्णी, सारंग कामतेकर, राजेश पिल्ले, निहाल पानसरे यांची नावे चर्चेत आहेत.  

महेश लांडगे यांची शांताराम भालेकर, विजय फुगे, सचिन लांडगे यांच्या नावाला पसंती असल्याचे बोलले जात आहे. यांच्यापैकी आमदार लांडगे यांच्या एका समर्थकाची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागू शकते. तर, आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून सारंग कामतेकर यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे. कामतेकर यांच्या नावाला विरोध झाला तर, ऐनवेळी  शंकर जगताप यांचे नाव पुढे येवू शकते.  

Posted On: 06 May 2017