ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ताथवडेतील जिल्हा परिषद शाळा महापालिकेकडे वर्ग करा - राहुल कलाटे

पिंपरी, दि. ६ - ताथवडे गावचा महापालिकेत समावेश होऊन आठ वर्षे झाली. जिल्हा परिषदेची शाळा अद्याप महापालिकेकडे वर्ग करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शाळा तत्काळ महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख गटनेते राहुल कलाटे यांनी महापालिकेकडे केली आहे. 

राहुल कलाटे यांनी याबाबत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानूसार ३० जुलै २००९ रोजी ताथवडे गावचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. त्यामुळे ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळा महापालिकेकडे वर्ग करण्यात यावी. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे ६ जानेवारी २०१० रोजी अर्ज केला आहे. तसेच महापालिका शिक्षण मंडळ, भूमी जिंदगी विभागानेही जिल्हा परिषदकडे पाठपुरावा केला आहे. परंतु, जिल्हा परिषदेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 

तब्बल वर्ष उलटूनही न्यायालयीन स्थगितीचे भिजत घोंगडे कायम आहे. यावर महापालिकेच्या कायदा विभागाला आजतागायत काहीही कार्यवाही का करता आली याचा आयुक्तांनी शोध घेऊन दोषींवर कारवाई करावी. महापालिकेच्या लिगल विभागाच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची घर का Posted On: 06 May 2017