ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कचरा संकलन, वाहतुकीचे टेंडर ६ वर्ष काढलेच नाही

पिंपरी, दि. ९ - पिंपरी- चिंचवड शहराच्या सहा प्रभाग क्षेत्रातील कचरा गोळा करणे, त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे या कामाचा ठेका विनानिविदा एकाच ठेकेदाराला देण्यात  आला आहे. अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमतामुळे गेली सहा वर्षे निविदा प्रक्रियाच राबविली गेली नाही. ठेकेदाराला दरवर्षी टक्के दरवाढ देत सलग चार वर्ष मुदतवाढ देणा-या आरोग्य विभागाने यंदाही ठेकेदाराला पुन्हा चार महिने मुदतवाढ मिळावी, असा घाट घातला आहे. निविदा प्रक्रीयेला विलंब होईल, असे नेहमीचे पालपुद लावत कोटी ५५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवयात आला आहे.

 महापालिका हद्दीत दररोज ७४५  मेट्रीक टन कच-याची निर्मिती होते. मोशी कचरा डेपोच्या ८१ एकरावर या कच-याची विल्हेवाट लावली जाते. कचरा वाहतुकीकामी ४२३ वाहनांचा वापर केला जातो. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घरोघरचा कचरा गोळा करणे, मोशी कचरा डेपोपर्यंत त्याची वाहतूक करणे या कामासाठी सन २०११-१२ मध्ये देशपातळीवर निविदा काढण्यात आली. ग्लोबल टेंडर काढल्यावरही महापालिकेने '' आणि '' प्रभागासाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड या लोकल कंपनीलाच ठेका दिला. प्रथम वर्षासाठी प्रतिटन ७१४  रूपये त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी पाच टक्के दरवाढीस मान्यता देण्यात आली होती.

 अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने करारनाम्यातील प्रत्येक वर्षासाठी पाच टक्के दरवाढ हा नियम कायम ठेवून बीव्हीजी इंडीया यांनाच दरवर्षी कामाचा ठेका वाढवून दिला. कामाची मुदत संपल्यानंतर निकोप स्पर्धेसाठी नव्याने निविदा प्रक्रीया राबविणे गरजेचे असताना केवळ पाच टक्के दरवाढ देऊन आहे . त्याच ठेकेदाराला कायम ठेवण्यात अधिकारी धन्यता मानत आहे. सन २०१६ मध्येही पाचव्या वर्षासाठी प्रतिटन ८६८  रूपये दरवाढीस मान्यता देत बीव्हीजी इंडीया यांना , आणि प्रभागातील प्राथमिक आणि द्वितिय टप्प्यातील कचरा गोळा करण्याचे काम देण्यात आले.

 तसेच, , आणि प्रभागातील दुस-या टप्प्यातील Posted On: 09 May 2017