ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आळंदीकरांना रोज पाणी पिंपरी महापालिका देणार

पिंपरी, दि. १० - तिर्थ क्षेत्र आळंदीला पाणी देण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका सकारात्मक आहे. आळंदीकरांना दिवसाला दोन लाख लीटर पाणी महापालिका देणार असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच याबाबत नियोजन करण्याचे प्रशासनाला आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याच्या कानाकोप-यातून हजारोंच्या संख्येने तीर्थक्षेत्र आळंदीला येणा-या भाविकांसाठी पिण्याचे पाणी द्यावे, अशी मागणी आळंदीकर पिंपरी-चिंचवडकर महापालिकेकडे करत आहेत.तीर्थक्षेत्र आळंदी सध्या अपु-या आणि दूषित पाण्याच्या समस्येने त्रस्त आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणीपुरवठा केला जाते. त्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठ्याव्यतिरिक्त शिल्लक कोट्यातून महापालिका आळंदीला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

आळंदीकरांना पाणी देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सकारात्मक आहे. आळंदीच्या काही भागाला पालिका पाणी देत आहे. परंतु, आळंदीकरांनी आणखी वाढीव पाणी देण्याची मागणी केली आहे. आळंदीकरांना वाढीव दिवसाला 2 लाख लीटर पाणी पिंपरी महापालिका देणार आहे. त्याचे नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितलेदरम्यान, आळंदीकरांना पाणी देण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली होती