ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बेकायदा ओव्हर टाईम बंद

पिंपरी, दि. १२ -  कार्यालयीन वेळेनंतर थांबून पगाराबाहेरील कामे  करायची सवय लागलेल्या कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. कार्यालयीन वेळेनंतरही विविध विभागात नागरिक, ठेकेदार, व्यावसायिकांना महापालिका भवनात 'प्रवेश बंदी' करणारा आदेश आयुक्तांनी काढल्याने अनेक अधिकारी कर्मचारी यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. 

कार्यालयीन वेळेनंतरही विविध विभागात नागरिक, ठेकेदार, व्यावसायिकांचा महापालिका भवनात मोठ्या प्रमाणावर राबता असल्याच्या तक्रारींची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पावणेसहा नंतर महापालिकेत शुकशुकाट झाल्यावर अधिकारी, ठेकेदार, व्यावसायिकांचा 'बाजार' भरत असल्याची खातरजमा केल्यानंतर आयुक्तांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे. कार्यालयीन कामकाजानंतर महापालिकेत अधिकारी कर्मचाऱ्यांशिवाय कोणत्याही त्रयस्थ व्यक्तींनी थांबू नये. महापालिकेच्या बाहेरच्या व्यक्ती, ठेकेदार, वास्तुविशारद, व्यावसायिक आढळून आल्यास त्यासाठी संबंधित अधिकारी  कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कार्यालयीन वेळेनंतरच्या नागरिकांच्या उपस्थितीबाबतचे महत्वाचे तातडीचे परिपत्रक शाखाप्रमुख, विभागप्रमुखांसाठी जारी केले आहे. पिंपरी - चिंचवड महापालिका कार्यालयाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत आहे. मात्र, कार्यालयाची वेळ संपल्यानंतर काही विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय बाहेरील व्यक्ती कार्यालयात उपस्थित असतात. यामध्ये ठेकेदार, वास्तुविशारद,  व्यावसायिक अशा विविध व्यक्तींचा समावेश असतो. महापालिकेतील नगररचना विभाग, बांधकाम परवानगी विभागाचे कामकाज तर खऱ्या अर्थाने सायंकाळी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर सुरू होते. ठेकेदार, बिल्डर यांचीच कार्यालयात रेलचेल सुरू असते. आपल्या फायली मार्गी लावण्यासाठीच हे ओव्हर टाईम विशेष उत्साहाने केले जाते. 

या प्रकारांना आता लगाम बसणार आहे. सायंकाळी पावणेसहा वाजता कार्यालयाची वेळ संपल्यानंतर संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वगळता बाहेरील एकही व्यक्ती कार्यालयात उपस्थित राहणार नाही, याची सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असा आदेशच हर्डीकर यांनी काढला आहे. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर एखाद्या विभागात बाहेरील नागरिक, ठेकेदार, वास्तुविशारद किंवा व्यवसायिक आढळून आल्यास संबंधित विभागाच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. 

सुरक्षा विभागानेही कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बाहेरील व्यक्तींना महापालिकेत प्रवेश देऊ नये. संबंधितांनी या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कोणतीही तक्रार प्राप्त होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.