ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवसेनेतर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

पिंपरी, दि. १२ - शेतक-यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेतर्फे  आज (शुक्रवारी) भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता हे आंदोलन झाले. शहरप्रमुख महापालिकेतील गटनेते राहूल कलाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेवक निलेश बारणे, अॅड. सचिन भोसले, नगरसेविका मिनल यादव, रेखा दर्शिले, माजी नगरसेवक अनंत को-हाळे, विनायक रणसुभे, राम पात्रे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजाजन चिंचवडे, सल्लागार भगवान वाल्हेकर, राजेश वाबळे, रोमी संधू, युवराज दाखले, विशाल यादव, नेताजी काशीद आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते

महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतक-यांचे कर्ज माफ करणे गरजेचे आहे. पंरतु, शेतक-यांना कर्जमाफी देता सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतक-यांबाबत बेताल वक्तव्य करत आहेत, असे राहूल कलाटे म्हणाले

शेतकरी राजा हा देशाला धान्य पुरविण्याचे काम करतो. त्या शेतक-यांबद्दल सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असे बेताल वक्तव्य कसे करु शकतात असा प्रश्न उपस्थित करत कलाटे म्हणाले, दानवे हे ग्रामीण भागातून येतात. त्यांना शेतक-यांचे दु: माहित असतानाही त्यांनी शेतक-यांबद्दल बेताल वक्तव्य करणे निषेधार्ह आहे.  

गजाजन चिंचवडे म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे वारंवार बेताल वक्तव्य करत आहेत. शेतक-यांबद्दल त्यांनी वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. यापुढे त्यांनी शेतक-यांबाबत बेताल वक्तव्य केल्यास त्यांच्या विरोधात शिवसेना अधिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार आहे

शेतकरी अहोरात्र कष्ट करुन धान्य पिकवतो. शेतक-यांना कर्जमुक्तीची गरज आहे. परंतु, दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांबद्दल  बेताल वक्तव्य  केले आहे. याचा तीव्र शब्दात निषेध करतो, असे विनायक रणसुभे म्हणाले

Posted On: 12 May 2017