ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी महापालिका शिक्षण मंडळाचे १५१ कोटींचे अंदाजपत्रक

पिंपरी, दि. १५ - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सन २०१७-१८ चे सुमारे १५१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर सादर झाले आहे. शिक्षण मंडळ बरखास्त होऊन शिक्षण समिती अस्तित्वात येणार असल्याने मंडळाचे हे अखेरचे अंदाजपत्रक असणार आहे. या अंदाजपत्रकाला आयुक्तांनी सुचविलेल्या कपाती नाकारुन स्थायी समितीने शिक्षण मंडळ सदस्यांनी मांडलेले अंदाजपत्रक मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर मांडले आहे. महापालिका स्वहिस्सा सुमारे १०५ कोटी रुपये देणार आहे. तर, लाख रुपये शिलकीचे बजेट आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी हे अंदाजपत्रक सादर केले होते.

शिक्षण मंडळाने सुमारे १५१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये आयुक्तांनी सुमारे २५ कोटी रुपयांची कपात करत १२५ कोटी रुपयांच्या बजेटला मंजूरी दिली होती. तथापी, स्थायी समितीने आयुक्तांचे बजेट नाकारत शिक्षण मंडळाने सुचविलेले अंदाजपत्रकच अंतिम केले आहे. त्याच्यावर येत्या १९ मे रोजी होणा-या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

या अंदाजपत्रकात धन्वंतरी योजनेसाठी कोटी ५० लाख, विद्यार्थी गणवेश ७२ लाख ५० हजार, पी.टी गणवेश ५२ लाख, खेळ शाळा गणवेश २८ लाख, स्काउऊटगाईड गणवेश लाख, स्वेटर खरेदी कोटी २० लाख, विद्यार्थी पादत्राणे मोजे कोटी १५ लाख, विद्यार्थी पी.टी. शुज ८५ लाख, विद्यार्थी दप्तरे पाट्या ८० लाख, पावसाळी साधने कोटी ५५ लाख, शालेय साहित्य ९५ लाख, आधुनिक फळे १५ लाख, क्रिडा साहित्य १५ लाख, वॉटर बॉटल ४५ लाख, टॅब खरेदी प्रशिक्षण ५० लाख, फिल्टर ५० लाख, सीसीटीव्ही कॅमेरे कोटी सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास ७० लाख, व्यवसाय स्वाध्यायमाला कोटी, -लर्निंग स्कूल २ कोटी, विजरोधक यंत्रणा २५ लाख, आगरोधक यंत्रणा ५० लाख, मोठी कचरा पेटी २० लाख आदींचा प्रामुख्याने अंदाजपत्रकात समावेश आहे.


या खरेदीत आयुक्तांनी मोठी कपात सुचविली होती. मात्र, ही कपात फेटाळण्यात आली Posted On: 15 May 2017